ब्रेकिंग न्यूज

भाजपाला १०५ जागांचा शाप...? काय आहे १०५ जागांची साडेसाती ???* *कशी होणार आ

13/11/2019 20:25:12  1962   अँड निलेश आंधळे

*भाजपाला १०५ जागांचा शाप...? काय आहे १०५ जागांची साडेसाती ???*

*कशी होणार आकडेमोड ??*

 

भाजपाला १०५ जागांचा शाप... बंगळुरू : शापाचे रूपांतर वरदानात करण्यात यशस्वी झालेले कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडुरप्पा यांचे सरकार पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेजारच्या कर्नाटक राज्यानंतर महाराष्ट्रात देखील भाजपला १०५ जागा मिळाल्या आणि निवडणुकी आधी बहुमतात निवडून येईल असे वाटलेले युतीचे सरकार स्थापन करण्यात भाजपाला सपशेल अपयश आले. अशीच घटना  शेजारच्या कर्नाटक राज्यात घडली होती कर्नाटकात एकूण २२२ विधानसभा सदस्य आहेत येथे देखील भाजपाला १०५ जागांवरच समाधान मानावे लागले आणि याठिकाणी जनता दल आणि काँग्रेस यांनी एकत्र येत भाजपा एक क्रमांकाचा पक्ष असताना त्यांना सत्तेपासून वंचीत ठेवले परंतु लगेच झुकेल तो भाजपा कसा अवघ्या ६ महिन्यातच विद्यमान मुख्यमंत्री येडुरप्पा यांनी त्यांचे सरकार उलथवून टाकत जेडीएस ला सुरुंग लावत कुमारस्वामी सरकार पाडले. यावेळी जेडीएस कडून निवडून आलेल्या १५ आमदारांनी आणि १ अपक्ष आमदाराने  भाजपाला पाठींबा दिल्याने भाजपाला पाठींबा दिला परंतु पक्षातंर बंदीमुळे एकूण १७ आमदारांना आपली आमदारकी गमवावी लागली परंतु त्यामुळे बहुमताची मॅजिक फिगर ११३  वरून १०४ वर आली. याचाच फायदा घेत काँग्रेस आणि जनता दल आघाडीला झटका देत भाजपा सत्तेच्या अश्वावर विराजमान झाले आणि येडूरप्पा पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले.

अगदी असाच पेचप्रसंग महाराष्ट्रात देखील अवतरला असून भाजपाने जसा कर्नाटक पॅटर्न राबवून विरोधी पक्षाला झटका दिला तसा प्रयोग भाजपा महाराष्ट्रात करणार का ?? हे आता आपल्याला पुढील ६ महिन्याच्या आत कळेलच.

परंतु सध्या तरी भाजपाने भाजप सरकार स्थापन करू शकत नाही कारण शिवसेना त्यांच्या सोबत नाही असे सांगून भाजपाने खूप मोठी राजकीय खेळी  केलीय हे नक्कीच.

गेल्या काही दिवसात भाजपाने जरी मौन व्रत सुरू केले असले तरी भाजपाला देखील आलेली सत्ता हातची घालावयाची नाही. त्यामुळे भाजपा जरी आम्ही शांत आहोत हे दाखवत असला तरी ते देखील सत्तेची गणिते जुळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत हे देखील नक्की. फक्त भाजपाला यासाठी कर्नाटक सारखी वेळेची आवश्यकता असल्याने भाजप राष्ट्रपती राजवट किंवा अल्पमतातील सरकार ह्यापैकी काही राज्यावर लादून तो आवश्यक वेळ मिळवत तर नाही ना असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.

भाजपा शिवसेनेचे युती करून एकमेकांना पाडापाडीचे राजकारण आता त्यांच्याच चांगले अंगलट आले आहे. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्रातील राजकारणात घातलेले बारीक लक्ष देखील भाजपाला सरकार जुळविण्यात आडकाठी ठरले आहे. त्यातच प्रादेशिक पक्षांची अस्मिता , शेतकरी समस्या आणि भाजपाची मेगा  खोगीर भरती भाजपाला या निवडणुकीत अडचणीत आणताना आपल्याला पाहायला मिळाली. हेच विषय उचलून राष्ट्रवादिने त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. त्यातच या वातावरण निर्मितीचा फायदा काँग्रेस पक्षाला झाला आहे.

त्यामुळे भाजपासाठी सलग दुसर्यांदा शाप म्हणून पुढे आलेल्या १०५ आकड्याची आकडेमोड करून भाजपा या मॅजिक फिगर ला कमी अधिक करून हे आकड्यांचे गणित जुळणार हे कौशल्य आता आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. कर्नाटकात जरी भाजपाने सत्तेचे गणित जुळवले असले तरी हा शाप बनून आलेला १०५ चा आकडा त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही.

 

वाचा थेट मुख्यमंत्री येडूरप्पा यांच्या भेटीनंतर बंगळुरू मधूनच केलेले हे कर्नाटकाचे राजकीय विश्लेषण ....

सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकमधील 17 बंडखोर आमदारांबाबत दिलेल्या निकालानंतर राज्यातील राजकीय नाटक पुन्हा एकदा रंगतदार वळणावर पोहोचले आहे. न्यायालयाने आमदारांची अपात्रता कायम ठेवताना त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाची चिंता वाढली आहे. येडियुरप्पा सरकार सत्तेवर असले तरी 224 आमदार असलेल्या विधानसभेत त्यांच्याकडे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 113 आमदारांचे बहुमत नाही आहे. भाजपाचे सध्या कर्नाटक विधानसभेत 105 आमदार आहेत. तर त्यांना एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपाला बहुतांश जागांवर विजय मिळवावा लागणार आहे. 

 

 कर्नाटकमधील 15 विधानसभा मतदारसंघात 5 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजपाला या पोटनिवडणुकीत किमान सहा ते सात जागांवर विजय मिळवावा लागणार आहे. मात्र या निवडणुकीत पराभव झाल्यास भाजपाला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. तसेच त्यांना राज्यातील सत्ता गमवावी लागेल. 

 

कर्नाटकातील कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि जनता दल आघाडी सरकारचा 17 आमदारांनी पाठिंबा काढून घेतला होता. परिणामी आघाडीचे सरकार कोसळले. या आमदारांनी आपल्या आमदारकीचे राजीनामे तत्कालीन विधानसभा अध्यक्षांकडे सोपविले होते. पण तत्कालीन अध्यक्षांनी राजीनामे स्वीकृत केले नाहीत. याउलट विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी पक्षादेशाचे पालन केले नाही म्हणून पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसार 17 आमदारांना अपात्र ठरविले होते. तसेच विद्यमान विधानसभेची मुदत संपेपर्यंत म्हणजे मे 2023 पर्यंत या अपात्र ठरविताना विधानसभेची निवडणूक लढविता येणार नाही, असाही आदेश तत्कालीन अध्यक्षांनी दिला होता. त्यानंतर या आमदारांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.  

 

मात्र या आमदारांना अपात्र ठरवण्यात आल्याने विधानसभेमध्ये आमदारांची संख्या 207 इतकीच उरली आणि बहुमतासाठीचा आवश्यक आकडा 104 वर आला होता. त्यामुळे येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यात फारशी अडचण आली नव्हती. 

आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसमधील हे 15 बंडखोर आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच ते भाजपाकडून पोटनिवडणूक लढवण्याचीही शक्यता आहे. मात्र या आमदारांबाबत आपण राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे येडियुरप्पा यांनी सांगितले. 

 

 15 जागांवर पोटनिवडणूक झाल्यानंतर विधानसभेतील आमदारांची संख्या वाढणार आहे. त्या परिस्थितीत बहुमतासाठी आवश्यक आमदारांचा आकडाही वाढणार आहे. त्यामुळे सध्या 207 आमदारांच्या विधानसभेत 106 आमदारांचा पाठिंबा असलेल्या भाजपाला 15 आमदारांच्या नियुक्तीनंतर 222 सदस्य झालेल्या विधानसबेत बहुमतासाठी 112 जागांची आवश्यकता असेल. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपाला किमान 6 जागांवर विजय मिळवाला लागेल. पोटनिवडणूक झालेल्या 15 मतदारसंघात 2018 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएसने विजय मिळवला होता. त्यामुळे येथे या पक्षांना पराभूत करणे भाजपाल काहीसे जड जाणार आहे.