राष्ट्रिय जनसेवा पक्ष पदाधिकारी मेळावा ठाणे येथे संपन्न ....
ठाणे:- राष्ट्रिय जनसेवा पक्ष नवनियुक्त पदाधिकारी मेळावा ठाणे येथील लोहाना महाजनवाड़ी हॉल खारकर आळी, ठाणे (प) सोमवारी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे उदघाटन हे संत सेना महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाले. त्यानंतर दिपप्रज्वलन हे राष्ट्रिय जनसेवा पक्ष अध्यक्ष मा.महावीर गाडेकर साहेब, मा. वीरनाथ महाराज काळे, पक्ष सचिव मा.रमेश राऊत, डॉ आंनद मोरे, अभिनेता रवि वाघ यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात मा.अध्यक्ष महावीर गाडेकर साहेब यांनी राष्ट्रिय जनसेवा पक्षाची ध्येय, उद्दिष्ट ही भारतीय संविधानाला अनुसरून धर्मनिरपेक्षता, स्वातंत्रता, समता, बंधुता या तत्वावरती सेवाकार्य करत अखंड भारताच्या भविष्यासाठी राष्ट्रिय जनसेवा पक्ष कार्यरत राहिल असा विश्वास व्यक्त केला आणि कार्यकर्त्याना समाजकार्य करण्यासाठी प्रेरित करुन पुढील वाटचालिसाठी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिव व्याख्याते किमतु ओंबाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन हे श्री गणेश क्षीरसागर यांनी केले.कार्यक्रमाचे व्यवस्थापन मा संजय पंडित सर सचिन (आबा)गायकवाड सर आणि पदाधिकारी यांनी केले.
अध्यक्ष श्री गाडेकर महावीर,मुंबई
राष्ट्रीय सदस्य डॉ श्री आनंद मोरे,MD
युवा उपाध्यक्ष,श्री गौरव संत,MBA
उपाध्यक्ष श्री जीवन मसुरकर
सचिव,,श्री रमेश राऊत,
सह सचिव,,,श्री गणेश क्षीरसागर,
खजिनदार,,,अनिल पोपटराव शिरसाठ
संपर्क प्रमुख,,,श्री संजय पंडित,
उप संघटक ,,,श्री सचिनभाऊ गायकवाड,
उप सम्पर्क प्रमुख,,,,श्री गजानन राऊत,
महिला सम्पर्क प्रमुख,,सौ नंदिनी ताई,सोनवणे,
कोकण विभागीय सम्पर्क प्रमुख,,,,सौ सोनाली ताई चव्हाण,
महिला संघटक,
सौ आशा ताई कालेकर,
प्रवक्ते,,,ह भ प श्री काळे महाराज,
महिला प्रवक्ता,शैलजा लोखंडे ताई सर्वजन उपस्थित होते