ब्रेकिंग न्यूज

महाशिवरात्री निमित्त वाफारेवाडी येथे विविध कार्यक्रम ......

12/02/2020 19:27:15  450   दीपक उंडे

 श्री हरेश्वर पाणी फाउंडेशन तर्फे नम्र आवाहन नमस्कार गावकरी मित्रांनो,  गावातील सर्व माता भगिनी, आदरणीय सर्व वडीलधारी मंडळी यांना सुचित करण्यात येते की श्री हरेश्वर पाणी फाउंडेशन तर्फे  महाशिवरात्रीनिमित्त आपल्या गावामध्ये श्री ज्ञानेश्वर बोडके राहणार मान, जिल्हा पुणे, पुणे शहरा जवळील, एका गावातील एक नामवंत व प्रगतशील शेतकरी की ज्यांनी एका आपल्या नोकरीचा राजीनामा देत शेती हा व्यवसाय सुरू केला व अल्पावधीत मध्येच शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेतमालाचे भरपूर असे उत्पादन घेतले, शेतीमालाचे मार्केटिंग कसे करायचे, याबाबतच्या सर्व बाबींचा अभ्यास करून आज ते का मोठ्या शेतकरी समूहाचे जबाबदार व संस्थापक आहेत, त्या शेतकरी समूहाचा आजची वार्षिक उलाढाल ही जवळपास 400 कोटींची आहे, अशा एका प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन आपल्या गावातील शेतकरी बांधवांना लाभावे या हेतूने श्री हरेश्वर पाणी फाउंडेशन तर्फे श्री ज्ञानेश्वर बोडके यांचे व्याख्यान महाशिवरात्रीनिमित्त आपल्या गावातील वाफारे वाडी येथे आयोजित केलेले आहे हे व्याख्यान महाशिवरात्री च्या दिवशी वाफारे वाडी येथे आयोजित केलेले आहे , तरी गावातील सर्व माता-भगिनींना पितृतुल्य सर्व वडील धारी व सर्व बंधूंना,  मित्रांना एक नम्र आवाहन आहे की या सुवर्ण संधीचा फायदा आपण सर्वजण घेऊया , आजच्या या कठीण समय चांगल्या प्रकारे शेती करून शेत मालाचे मार्केटिंग कसे करायचे ,त्याचे विक्री व्यवस्था कशी करायची  व कमी पाण्यामध्ये शेती कशी करायची याबाबतचे अमुल्य असे मार्गदर्शन श्री ज्ञानेश्वर बोडके आपणास करणार आहेत तरी ही संधी आपण चुकवू नये , परत एकदा सांगतो या कार्यक्रमाचे ठिकाण आहे. स्वयंभू शिवसाई मंदिर वाफारे वाडी,  जनसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे महाशिवरात्री निमित्त हरेश्वर पाणी फाउंडेशन हा कार्यक्रम ठेवलेला आहे . त्याठिकाणी  श्री ज्ञानेश्वर बोडके यांचे व्याख्यान होईल,  तरी आपण सर्वांनी या ठिकाणी हजर राहावे, व्याख्यानाचे वेळ आहे सकाळी 10 हा ते  बारा वाजेपर्यंत व तदनंतर    आपणा सर्वांसाठी महाशिवरात्रीनिमित्त फराळाची व्यवस्था  करण्यात आलेली आहे.

 सर्वांनी याची नोंद घ्यावी व या अमुल्य व्याख्यानाचा फायदा घ्यावा, श्री हरेश्वर पाणी फाउंडेशन तर्फे गेल्यावर्षी जलसंधारणाचे काम केले. तालुक्यात तिसरा नंबर आला. सर्व जलमित्र व ग्रामस्थांच्या सहकार्याने काम झालं . महाराष्ट्र राज्यात, जिल्ह्यात आणि तालुक्यात, कर्जुले हरेश्वर गावाने  पाणी फाउंडेशन मध्ये उत्कृष्ट व चांगलं काम केलं असा संदेश समाजात गेला.  .यावर्षी  आपण पण समृद्ध गाव या योजनेअंतर्गत आपल्या गावामध्ये अनेक उपक्रम राबवणार आहोत शेती चांगल्या प्रकारे कसे करता येईल, पाण्याचे नियोजन चांगल्या प्रकारे कसे करता येईल .शेतीमालाचे मार्केटिंग ,विक्री कशाप्रकारे चांगली करता येईल येईल इत्यादी सर्व बाबींवर आपण यापुढील भविष्यात काम करणार आहोत, आपल्या सर्वांचा सहभाग यामध्ये राहीलच, याबद्दल श्री हरेश्वर पाणी फाउंडेशन चांगलं काम करेल यात कोणतीही शंका नाही .आपल्या सर्वांचा सहभाग हीच आपली समृद्धी असेल आणि या समृद्धी ची पहिली पायरी म्हणून आपण महाराष्ट्रातील एका प्रगतीशील शेतकऱ्याची अनुभव त्यांची जीवनगाथा या व्याख्यानातून ऐकणार आहोत व त्या व्याख्यानाचा फायदा घेऊन आपण यापुढील मार्गक्रमण करणार आहोत तरी पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांना माता-भगिनींना व सर्व बंधूंना एकदा हे व्याख्यान ऐकण्यासाठी चे आग्रहाचे व विनम्र अभिवादन आव्हान करण्यात येत आहे.
वाफारे गणप त 12/02/2020 22:02:32

उत्कृष्ट व चांगलं काम आहे.