ब्रेकिंग न्यूज

भोसे येथे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती उपक्रमांतर्गत मार्गदर्श

03/05/2020 10:31:45  280   अँड.नीलेश आंधळे

भोसे येथे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती उपक्रमांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले...

 

शेलपिंपळगाव , दि. २४ ( वार्ताहर ) कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याबरोबरच आपण आपली रोग प्रतिकार शक्ती वाढविली पाहिजे. यासाठी घरातील व घराच्या आजूबाजूला असलेल्या काही वनस्पतींचे सेवन करायला हवे. यामध्ये हळद , काळी मिरी ,  तुळशीची , कडुलिंबाची पाने , गवतीचहा , सेंद्रिय गूळ तसेच वनस्पतीत ज्याला राजा म्हणून संबोधले जाते.असे गुळवेल नावाची वनस्पती याच्या सहाय्याने काढे बनवून त्याचे घरातील प्रत्येक व्यक्तीने सेवन केले तर आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते. यासाठी आयुर्वेद  व पंचगव्य ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. याबाबत पंचगव्य एम. डी. आशिर्वाद अरुण हलगे,मयुर कुटे,अकबर मुलाणी यांनी भोसे गावामध्ये वाडी , वस्तीवर जाऊन जनजागृत्ती करण्याचा उपक्रम राबविला.

भोसे ग्रामपंचायत , उत्सव कमिटीच्या सहकार्याने भोसे गावामधील वाडी-वस्तीवर जाऊन प्रत्येक वनस्पतींचा उपयोग आपण कशाप्रकारे करू शकतो. आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या वनस्पतींचा काढा पिण्याची सवय लावून घेतल्यास आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते.सेंद्रिय शेतीपासून तयार केलेली पिके यामध्ये , तरकारी , फळभाज्या , पालेभाज्या याचे प्रमाण आपल्या आहारात वाढविले पाहिजे. रासायनिक खतांपासून तयार केलेल्या पालेभाज्या , फळभाज्या , आपल्या आरोग्यास धोकादायक ठरतात. सततचे आजारपण आपल्या वाट्याला येते. त्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती कमी पडते. त्यामुळे कुठलाही आजार आपल्या शरीरात शिरकाव करतो. यासाठी तंदुरुस्त शरीर ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी निदान आपल्या कुटुंबासाठी सेंद्रिय शेती करून त्याद्वारे तयार केलेल्या पालेभाज्या , फळभाज्या यांचा आहार घेतला पाहिजे. गाय , म्हैस यांच्यापासून आपणास दूध तर त्यांच्या शेणा मुत्रापासून सेंद्रिय खत तयार होते. रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय शेती करून पिक उत्पादन करून त्याचा आपल्या आहारात वापर केल्यास आपले शरीर निरोगी राहिल. यासाठी सकस आहार , वर नमूद केल्याप्रमाणे काढा पिण्याची सवय , थोडासा वेळ काढून व्यायाम , योगासने , सूर्य नमस्कार या बाबी नित्यनेमाने केल्यास आपली रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. अलीकडे कोरोना संसर्ग या आजाराने डोके वर काढले आहे. आपला भारत देशातील व  संपूर्ण जगभरातील लोकांचा बळी कोरोना संसर्ग प्रादुर्भाव वाढल्याने होत असंल्याचे चित्र आपण दररोज पाहतो व ऐकतो आहे. आपली रोग प्रतिकार शक्ती वाढविणे व शरीर मजबूत ठेवण्यासाठी आयुर्वेद व पंचगव्य ज्ञान आत्मसात करून त्याचे अनुकरण केले तरच या जीवघेण्या आजारापासून आपण आपला बचाव करू शकतो. अशाप्रकारचे जनजागरण आपल्या ओघवत्या , व सोप्या भाषेतून आशिर्वाद हलगे ( एम. डी. पंचगव्य ),मयुर कुटे,अकबर मुलाणी यांनी संपूर्ण भोसे गावातील वाडी वस्तीवर जाऊन लोकांना प्रबोधन केले. भोसे ग्रामपंचायत , उत्सव कमिटीचे पदाधिकारी , पोलीस पाटील , तलाठी , ग्रामविकास अधिकारी , रेशन दुकानदार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.