ब्रेकिंग न्यूज

खेड तालुक्यात आज पाच नवे पॉझिटिव्ह.... तर राजगुरूनगर शहरातील शासकीय कार्या

18/06/2020 12:34:43  25659   अँड. निलेश आंधळे

खेड तालुक्यात आज पाच नवे पॉझिटिव्ह....

तर राजगुरूनगर शहरातील शासकीय कार्यालयांतील दोन कर्मचारी पॉझिटिव्ह !!

 

राजगुरूनगर : खेड तालुक्यात युनिकेअर हॉस्पिटल मध्ये काल रजिस्टर झालेल्या एका रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच येलवाडी येथे देखील ४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आल्याने आता खेड तालुक्यात ५ नवे रुग्ण वाढले आहेत.

त्याचबरोबर राजगुरूनगर जिल्हा व सत्र न्यायालयात तालुक्याबाहेरून येणारा एक न्यायालयीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. न्यायालयात विशेष काळजी घेतली जात असून अतितातडीच्या कामासाठीच न्यायालयात यावे असे आवाहन वकील बारचे अध्यक्ष सुभाष कड व संजय पानमंद यांनी केले आहे.

तसेच वाडा रोड येथे असलेल्या एल.आय.सी कार्यालयातील पुण्याहून येणारा एक कर्मचारी देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांत विनाकारण येणाऱ्यांनी देखील विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.सदर चे दोन्ही कर्मचारी हे त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना खेड तालुक्यात ग्राह्य धरले जात नाही.

याबाबत अधिकृत माहिती खेड पंचायत समिती सभापती अंकुश भाऊ राक्षे व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे यांनी पुणे ब्रेकिंग न्यूज शी बोलताना दिली.
Bablu Panbude 18/06/2020 12:45:28

Thanks to Information.


सोपान शंकर डुंबरे 18/06/2020 18:56:32

खूप छान न्युज असतात तुमचा व तालुक्याचे update तुम्ही देता त्या बद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन


निलेश संजय टाकळकर 19/06/2020 18/06/2020 20:09:00

आपणाकडून जी रोज करोना विषयी माहिती पुरविली जात आहे हे वाचुन ग्रामीण भागातील लोक त्या ठिकाणी जाण्याचे टाळतात खुप छान माहिती देता


श्रीगणेश गावडे 18/06/2020 21:30:31

खूप छान माहिती दिली जाते, त्यामुळे सगळ्यांना तालुक्यातील update कळतात


मिलखे सुनिल 18/06/2020 21:33:21

तुम्ही जी बातमी आपल्या भागातील वर्तमान पञात छापता व लोकांना यापासून माहीती मिळते. अगदी मनापासून धन्यवाद साहेब.पण आमच्या नायफड गावातील बातमी असेल तर आम्हांला मदत करत जावा ही विनंती करतो...


Mahendra Dasu Gaysamudre 18/06/2020 21:59:19

खेड तालुका बंद करा काही दिवस अंकुशशेठ राक्षे सभापती साहेब


Vishnu Kad 18/06/2020 22:13:48

Take lock down partial so that crowd will be reduced.


VIDHYADHAR MINDE 18/06/2020 22:20:27

thanks for informing


Jaya bapu shinde 18/06/2020 22:43:13

Khupc surek kam ya mule aplya talukya babat savistar mahiti kalate


प्रवीण संघवी 18/06/2020 22:53:24

सर्वांगिन म्हायती साठी आपला फार मोलाचे काम आहे, धन्यवाद !


प्रवीण संघवी 18/06/2020 22:53:29

सर्वांगिन म्हायती साठी आपला फार मोलाचे काम आहे, धन्यवाद !


Adv Santosh Jadhav 18/06/2020 23:22:34

तालुक्यातील सर्व जनतेने स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कोरोना चा प्रसार रोखण्यास सर्व जनतेने एकमताने साथ दिली पाहिजे Adv Santosh Jadhav


Avinash Naikare 18/06/2020 23:28:57

You giving instant and good information so aware about situation and take care ourselves from covid19 . your news play important role in this Circumstance.


Kalpana Vivek Mhalgi 19/06/2020 02:06:40

Veri nice


लतिफ गुलाब शेख सर 19/06/2020 08:59:33

माझे मार्गदर्शक मित्र आंधळे सर यांचे चिरजिंव निलेश खेड तालुक्यात अपडेट बातमी देवून चांगले प्रबोधन कार्य चालु आहे त्यामूळे त्यांच्या या कार्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा


Shriram Zinjurke 19/06/2020 09:40:14

आपल्या चॅनल च्या माध्यमातून आपण तालुक्यातील जनतेला अतिशय उत्कृष्ट ची माहिती देत आहात त्यामुळे लोक सतर्क होऊन कोरोना चा सामना करू शकतील व अनावश्यक ठिकाणी जाण्याचे टाळतील .धन्यवाद....


संपादक 19/06/2020 12:33:00

आपल्या सर्वांच्या विश्वासाच्या आणि पाठींब्याच्या जोरावरच एक वर्षाच्या आतच पुणे ब्रेकिंग न्यूज ने १० लाख Subscriber चा टप्पा पार केला आहे.असेच प्रेम निरंतर राहू द्या !!