वाहनांची तोडफोड करून ओटा स्किम परिसरात दहशत माजवणाऱ्या आरोपींना अटक युनिट 2 ची कारवाई .....
निगडी पोलिस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातील महिला फिर्यादीच्या पती सोबत झालेल्या भांडणाची कारणावरुन दिनांक 6/7/2020 रोजी साडेअकराच्या सुमारास आरोपी संग्राम भोसले व इतर पाच आरोपींनी मिलिंद नगर ओटा स्कीम येथे येऊन लोखंडी रॉड कोयते हातोडी अशी घातक हत्यारे सोबत घेऊन येऊन फिर्यादीला शिवीगाळ करीत फिर्यादीच्या गळ्यातील 4 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली तसेच परिसरात दहशत माजवण्यासाठी पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड केली
ओटा स्कीम परिसर गुन्हेगारीचे माहेरघर बनत असताना युनिट 2 ने वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस डी निलपत्रेवार ए एस आय संपत निकम पोलीस हवालदार दीपक खरात पोलीस नाईक चेतन मुंडे व जमीर तांबोळी यांचे खास पथक ओटा स्कीम परिसरात पाठवून आरोपींची शोध मोहीम राबविली असता सदर गुन्ह्यातील आरोपी विकी उर्फ विकास शिवाजी लष्करे वय 23 धंदा बिगारी काम राहणार राजनगर समाज मंदिर जवळ ओटा स्कीम निगडी व त्याचे इतर दोन साथीदार विधिसंघर्षग्रस्त बालक अशा तिघांना ओटा स्कीम परिसरातून चोवीस तासाच्या आत अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 आर आर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक श्री उत्तम तांगडे मार्गदर्शनाखाली करण्यात आली