ब्रेकिंग न्यूज

पिंपरी-चिंचवडमधील सिटी वन सेंट्रल मॉल मधील लॉकडाऊन काळातील शॉपचे भाडे माफ क

11/09/2020 08:40:34  866   पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो

पिंपरी-चिंचवडमधील सिटी वन सेंट्रल मॉल मधील लॉकडाऊन काळातील शॉपचे भाडे माफ करण्याची भाडेकरूंची मागणी.....

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मधील सिटी वन सेंट्रल मॉल मधील लॉक डाऊन च्या काळातील शॉपचे भाडे माफ करण्यात यावे तसेच कोविड १९ चे पार्श्वभूमीवर मालकांनी जोपर्यंत ही महामारी कमी होत नाही तोपर्यंत ठरलेल्या भाड्यात सवलत द्यावी अशी मागणी शॉप चालकांनी केली आहे

शासनाने लॉकडाऊन काळात सर्व भाडेकरूंची भाडे माफ करा असे तोंडी आदेश दिला होता तशी जाहीर घोषणा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती परंतु लॉक डाऊन हे हनुमानाच्या शेपटी प्रमाणे वाढतच चालले आहे कोरोनाची महामारी कधी संपणार याबाबत कुठली निश्चिती राहिली नाही यामध्ये सामान्य व्यवसायिक भरडला जात आहे वास्तविक उद्योग-व्यवसाय वाढीसाठी शासनाने प्रोत्साहन देणे गरजेचे होते परंतु शासनाने याबाबत अद्याप कुठलेही ठोस पाऊल उचलले दिसत नाही त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून देखील मालक मात्र भाड्यात कुठली सूट द्यायला तयार नाही याबाबतची तक्रार सर्व गाळा मालकांनी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक व न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी याबाबत गांभीर्यपूर्वक लक्ष घालून योग्य ती  कार्यवाही करावी असे सूचनावजा आदेश जिल्हाधिकारी पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांना दिले आहेत.

याबाबतीत व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पोपट शेठ घनवट सचिव सचिन वाघमारे मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय पानसरे तसेच इतर कार्यकर्त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे आता पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी देशमुख साहेब याबाबत काय निर्णय घेणार हे पुढील काळातच समोर येईल परंतु याबाबत शासनाने तथा प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास रिपाई आठवले गट पिंपरी-चिंचवड शहरात मॉलच्या मालका विरोधात मोठे आंदोलन उभे करेल असे रिपाई व्यापारी आघाडी सचिव सचिन बापूसाहेब वाघमारे यांनी सांगितले
समाधान ज्ञानेश्वर साळुंखे 11/09/2020 09:24:47

बेस्ट


Jitesh jadhav 13/09/2020 01:42:47

8605062113