ब्रेकिंग न्यूज

कवठे गावात रात्री दंगल माजवण्याचा प्रयत्न संतप्त जमावाने दंगेखोराच्या

20/09/2020 20:13:54  6442   योगेश लंघे

कवठे  गावात  रात्री  दंगल माजवण्याचा  प्रयत्न  संतप्त  जमावाने दंगेखोराच्या  गाड्या फोडल्या.

शिरुर तालुक्यातील  कवठे येमाई गावात  रात्री 12 वाजता  तूफान  झाला. 2 गटात  झालेल्या हाणामारीत  4 मोटारसायकल दंगा  माजवण्या साठी  आलेल्या  दंगे खोरानी  फोडल्या.व एका मुलीला  बळजबरीने उचलुन गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला. वर संतप्त झालेल्या जमावाने  दंगेखोराची  Scorpio गाडी फोडली. दंगेखोरानी प्रथमता गावात आल्या वर दहशत माजवण्या साठी. हातात कोयते तलवारी घेऊन  गाडी वर चढुन नंगानाच केला.मद्यधुंद असलेले दंगेखोर यांनी 4 जणावर  कोयत्याने  हल्ला करण्याचा  प्रयत्न केला. मग  संतप्त  जमावाने दंगेखोराच्या गाड्या  फोडल्या असल्याचे  गावकर्यानी  सांगीतले.  पोलीस उपनिरीक्षक भगवानराव पालवे यांच्या सतर्के  मुळे मोठा अनर्थ टळला आहे. 

पोलिस जर  वेळेवर पोहचले नसते. तर मोठा अनर्थ झाला असता. पोलीसांचे  गावकर्‍यांनी  अभिनंदन केले. ह्या  हल्यात  संकेत  बोर्हाडे.  रितेश भोर  योगेश रोडे  संतोष गोसावी  हे जखमी झाले असून  त्याच्या वर  उपचार सुरू आहेत.  दंगा माजवण्यासाठी  ज्यानी ह्या तरुणांना बोलवले होते त्याला रात्री च पोलीसांनी अटक केली आहे.