ब्रेकिंग न्यूज

शिवजयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद....

31/03/2021 09:09:39  304   अँड.नीलेश आंधळे

शिवजयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद....

चाकण : तिथीप्रमाणे साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त श्री शिव छत्रपती गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उदंड प्रतिसाद दिला दिनांक 31 3 2021 रोजी चाकण तळेगाव चौक येथे पार पडलेल्या या शिबिरात १०० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिव छत्रपती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष कुशल भाऊ जाधव व त्यांच्या मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते हे रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथे स्थित पिंपरी चिंचवड रक्तपेढी ने विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी विशाल भाऊ जाधव यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले तसेच शिवजयंतीनिमित्त तमाम चाकण करांना शुभेच्छा दिल्या.