ब्रेकिंग न्यूज

शिरुर तालुक्यातील प्रियांका ताई धोत्रे ही तरुणी कोरोना मध्ये करत आहे लाख

05/05/2021 08:31:31  175   योगेश लंघे पाटील

शिरुर तालुक्यातील प्रियांका ताई धोत्रे ही तरुणी कोरोना मध्ये  करत आहे  लाख मोलाची मदत

 

कोणाला ऑक्सिजन बे… कोणाला व्हेंटिलेटर कोणाला साधा बेड… गंभीर रुग्णांसाठी बेडसाठी आर्त हाक… कोणाला  इंजेक्शन… कोणाला ॲम्बुलन्स हवी असल्यावर शिरूर ची सामाजिक कार्यकर्ता प्रियंकाताईत धोत्रे सर्वांच्या मदतीला धावून येऊन मदत आणि मदतीसाठी प्रयत्न करत असताना दिसत आहे. ही शिरूर तालुक्यातील शिरूर शहरातील तरुण तरुणींसाठी एक आयडॉल च म्हणावे लागेल…

      शिरूर शहरातील हूडको वसाहत येथे राहणारी युवा स्पंदन संस्थेचीची सामाजिक कार्यकर्ता प्रियंका अशोक धोत्रे स्वतः कोरोना संसर्गातून सावरून शिरूर शहर शिरूर तालुका पुणे जिल्हा या भागातील कोरोनाग्रस्त मदतीसाठी रात्रंदिवस करत आहे. वयाने लहान असणाऱ्या ह्या ताईच्या कामाचे कौतुक करणे तेवढे थोडे आहे. तर समाजातील मुलींसाठी एक आदर्श घालून दिलाय प्रियंका धोत्रे एक आयडॉल असणारच..

         शिरूर शहरातील अनेक सामाजिक कामामध्ये मोठं बरोबर नेहमी खारीचा वाटा उचलणारी एक लहान प्रियंकताई प्रत्येकाबरोबर मन भरून बोलणारी महिला, तरुण, तरुणी, वृद्ध, सर्वांच्या मदतीला धावून येणारी प्रियंकाला काही दिवसापूर्वी कोरोना संसर्गाने गाठले मोठ्या धैर्याने तिने त्यास परतवून लावले.

     यावेळेस कोरोना ग्रस्तांसाठी नक्की काय काय अडचणी येतात त्यांना कसली मदत हवी ती मदत कशी मिळवायची यासाठी तिने प्रयत्न सुरू केले.     गेली महीना ते दीड महिन्यापासून तिने आपला सामाजिक कार्याचा वसा चालू ठेवला कोरोनाग्रस्त सर्वांना प्लाजमा असो, रक्त असो, साधे बेड, ऑक्सिजन बेड असो किंवा व्हेंटिलेटर बेड असो यासाठी तिने प्रयत्न सुरू केले व्हाट्सअप च्या माध्यमातून Shirur helping hands ग्रुप बनवून त्याद्वारे स्टेटस किंवा आपले ग्रुप या सर्वांवर ती मेसेज जाऊन मदतीची विनंती आवाहन करत असताना दिसत असते. आपण केलेल्या मदतीबाबत ना कुठे प्रपोगंडा ना फोटोसेशन हाव केवळ सामाजिक कार्य करण्याचा एकमेव उद्देश घेऊन सुरू असलेले सामाजिक कार्य.

          वयाने लहान असणाऱ्या या प्रियंकाताईस एवढी ऊर्जा एवढी शक्ती कुठून येते जे अनेकांना जमत नाही ते काम ती स्वतः करताना पाहून सर्वांना आश्चर्य नक्कीच होत आहे.

          या कामांमध्ये तिला तिचा भाऊ चेतन धोत्रे व इतर मित्र मंडळीही आता मदत करायला पुढे सरसावले आहे जे पुण्यातून काही तर काही शिरूर तालुक्यातून काही नगर तालुक्यातून ताईच्या मदतीला हात पुढे येत आहे.

          यातून अनेकजणांचे प्राण, संसार कोरोना संसर्ग काळात वाचवण्यासाठी प्रियांकाची सुरू असलेली धडपड अनेकांच्या काळजाचा ठाव घेते हे मात्र नक्की खरे आहे.

     आज पर्यत ४०/५० जणांना मदत केली आहे प्लाझ्मा ह्हेन्टिलेंटर बेड , आॕक्सीजन बेड  तीस जणांना प्लाझ्मा भेटून दिला असून, कोरोना महामारी काळामध्ये आपण कोणाच्यातरी उपयोगी पडत आहोत हे सर्वात मोठे समाधान आहे.