ब्रेकिंग न्यूज

सविंदणे ( लंघे मळ्यात) सैनिकांनी स्वखर्चाने मडके शेतमधील 20 वर्षे रखडले ले

07/06/2021 10:10:09  443   योगेश लंघे पाटील

*माजी सैनिकांनी स्वखर्चाने मडके शेतमधील 20 वर्षे रखडले ले काम अखेर पूर्ण.*.

 

आज सविंदणे गावचे चे *माजी सैनिक व युवा नेते श्री अनिल (भाऊ) लंघे फौजी, श्री बबन कारभारी लंघेमाजी सैनिक, व श्री भानुदास भोर मा. ग्रामपंचायत सदस्य सविंदणे, रेखाताई भोर ग्रामपंचायत सदस्य सविंदणे, मंगेश लंघे युवा नेते, पत्रकार योगेश लंघे*  यांनी मागील आठवड्यात शिरूर आंबेगाव शिवहद्दी चा रस्ता  मंगेश लंघे सचिव यांचे घर ते शिवमार्गे..मडके वस्ती लहान चारी dp..ते गावडे यांचे शेतापर्यंत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मागील आठवड्यात करून कामाला सुरवात केली होती. आज उर्वरित दीड किलोमीटर रस्त्याचे मुरूम टाकून दुरुस्त करून दिला.  मळ्यातील ट्रॅक्टर संघटनेचे सर्व कार्यकर्ते  *ट्रॅक्टर साठी कानिफनाथ भोर, विशाल लंघे.उमेश लंघे गंगाराम लंघे, संदीप लंघे , बंडू शेठ लंघे, हनुमंत दिनकर लंघे खंडुभाऊ लंघे. प्रभुनाना लंघे.गणेश रामदास लंघे,नितीन लंघे , विनायक लंघे, पिंटू लंघे यांचे सहकार्य मिळाले..*

या शिव रस्त्याच्या पश्चिमेला धुमाळ वस्ती व पूर्वेला लंघेवस्ती चे मडके शेत आहे, हा शिव रस्ता दोन्ही कडेच्या शेतकरी च्या वादामुळे 25 वर्षे दुरुस्ती साठी रखडलेला होता, परंतु सुरेश ज्ञानेश्वर लंघे गुरुजी यांच्याशी तलाठी भाऊसाहेब लंघे व मंगेश लंघे यांनी सदर लोकसहभाग कामकाजात आपण सहकार्य करावे असे कळविले आसता सुरेश लंघे गुरुजी यांनी पाठींबा दिला  25 वर्षे आजपर्यंत रखडलेले काम आज  *श्री अनिल भाऊ लंघे फौजी, व श्री बबन कारभारी लंघे फौजी* भाऊसाहेब महसुल विभाग यांनी स्वखर्चातुन केलेल्या कामाला योगादान मिळाले आणी रस्त्याचे काम झाले. या दोन्ही माजी सैनिकांनी दोन्हीबाजूच्या शेतकऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर मार्गाने रस्ता दुरुस्ती साठी सहकार्य करण्याचे ठरविले असून तसा प्रस्ताव तहसीलदार शिरूर व तहसीलदार आंबेगाव यांस देऊन  लोणी सविंदणे रस्ता ते बेल्हा जेजुरी रस्त्यापर्यंत शिवरस्ता पक्क्या करण्यासाठी मागणी करावयाची ठरले आहे.सदर कामासाठी कायदेशीर सल्लागार व नियोजनाची जबाबदारी   *अॅड.अविनाश केरभाऊ लंघे व अॅड गोरक्ष नानभाऊ लंघे* यांचे कडे सोपविली असून पाठपुरावा दोन्ही माजी सैनिक व सर्व शेतकरी करणार आहे.

 *तसेच मडके शेत चा रखडलेले रस्त्याच्या कामाला देखील व आमराई पुलाचे काम व्हावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.* . सदर रस्त्याच्या कामामुळे परिसरातील शेतकरी वर्गाने वरील सर्व व्यक्तींचे  आभार मानून कौतुक केले आहे..👍👍👍