टाकळी पोस्ट ची सुत्रे हाती घेताच API संदिप कांबळे यांची धडक कारवाई.
पोलीस निरीक्षक श्री खानापुरे साहेब यांना माहिती मिळाली की म्हसे बुद्रुक गावच्या हद्दीत कुकडी नदीच्या नदीपात्रात इसम नामे रोहिदास बाजीराव पवार राहणार म्हसे बुद्रुक हा गावठी हातभट्टी दारू काढत आहे.

सदरची माहिती त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना दिली व कारवाईचे आदेश दिले असता एपीआय संदीप कांबळे सहायक फौजदार नजीम पठाण पोलीस नाईक सांगळे कॉन्स्टेबल नागलोत व होमगार्ड यांनी सदर ठिकाणी छापा मारून 1200 लिटर रसायन नष्ट केले व देशी दारू बनवणारे साहित्य जप्त केले आहे.