ब्रेकिंग न्यूज

*आळेफाटा येथे गोमांस वाहतुक करणाऱ्या गाडीवर पोलिसांची कारवाई* पुणे-नाशिक मह

29/06/2021 06:05:04  398   शुभम दळवी

*आळेफाटा येथे गोमांस वाहतुक करणाऱ्या गाडीवर पोलिसांची कारवाई*

पुणे-नाशिक महामार्गावर वडगाव आनंद गावच्या हद्दीत आळेफाटा पोलिसांनी गोमांस वाहतूक करणारे टेम्पो वर कारवाई करत सुमारे सहा लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिली याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवारी दिनांक 28 मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मौजे वडगाव आनंद तालुका जुन्नर जिल्हा पुणे गावच्या हद्दीत नाशिक ते पुणे रोडवर आळेफाटा चौक येथे नावे तनवीर इस्लाम शेख वय 34 वर्षे राहणार पत्रावळी ग्राउंड फ्लोअर रूम नंबर 20 नागपाडा पोलीस स्टेशन जवळ नागपाडा मुंबई अशोक लेलँड दोस्त गाडी क्रमांक एम एच डी आर 158 यामध्ये बेकायदेशीर कत्तल केलेल्या जनावरांचे मांस भरून वाहतूक करीत असताना मिळून आला तसेच सदरचा मांस भरून देणाऱ्या राजाबाबू दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे दोन लाख 52 हजार रुपये किमतीचे चौदाशे किलो मांस व चार लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड कंपनी कंपनी चे वाहन असा एकूण सहा लाख 52 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत केशव भागवत कोरडे पोलीस अंमलदार आळेफाटा यांनी तनवीर इस्लाम शेख व राजू बाबू यांच्याविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्याविरुद्ध संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 51 अ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे या पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निळकंठ कारखेले करत आहे
अविनाश सिताराम कोंडे 29/06/2021 21:18:09

प्रथम कर्तव्यदक्ष पोलीसयंञणेचे अभिनंदण व आपण बातमी देऊन ऊत्तम काम केलेय .देशी गोवशाच्या रक्षण संगोपणाविषयी आपणही जाग्रुती करावी हि विंनती आपलि बातमीची लिंक ओपण केल्यावर डाविकडची समासाच्या बाजुची अक्षरे दिसत नाहीत थोडा स्पेस देऊन लिहावे माझा मो नं ९८६००४५०१६ प्रभात फोटोज वर व्हाटस केले तर तुम्हाला फोटो पाठवतो की तुमची बातमी एका बाजुला कट कशी होते ते ...ऊदा ...पुणे ..नाशीक लिहीले असेल तर पुणे शब्द दिसत नाही धण्यवाद