ब्रेकिंग न्यूज

शिरूर पोलिसांची अवैध धंद्यावर धडक कारवाई

26/07/2021 08:36:26  412   योगेश लंघे पाटील

शिरूर पोलिसांची अवैध धंद्यावर धडक कारवाई

 

आज रोजी माननीय पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे साहेब यांनी अवैध धंद्यावर कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने Api संदीप कांबळे यांनी पथक तयार करून psi स्नेहल चरापले, asi नजीम पठाण,पो ना संजू जाधव, पो ना नाथा जगताप,पो कॉ नागलोथ,पो कॉ कोळेकर याचे पथक तयार करून कवठे यमाई येथे छापा टाकला असता इसम नामे निलेश नामदेव डोरके रा.कवठे यमाई हा गावठी दारू विक्रि करताना मिळुन आला त्यास ताब्यात घेण्यात आले त्याची कडून दहा लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.

आहे तसेच इसम नाव विक्रम मल्हारी खाडे रा रावदेवस्ती कवठे यमाई हा त्याचे घराचे मागे गावठी दारूची हातभट्टी तयार करून दारू तयार करत असले बाबत माहिती मिळाली मिळाल्याने त्या ठिकाणी पथकासह जाऊन छापा मारला असता सदरचा इसम हा रेड हॅन्ड  गावठी दारू तयार करताना मिळाला त्यास ताब्यात घेऊन गावठी दारू तयार करण्याचे साहित्य तसेच आठशे लिटर दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन नष्ट करण्यात आले आहे तसेच सदर पथकास विकास भिवाजी पवार हा त्याचे घराजवळ दारू तयार करीत असले बाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन छापा मारला असता त्याचे घराजवळ दोनशे लिटर दारू तयार करण्याचे रसायन मिळून आले ते जागीच नष्ट करण्यात आले आहे सदर इसमांच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास टाकळीहाजी दूर क्षेत्राचे हे साहेब पठाण हे करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली Api संदीप कांबळे ,psi स्नेहल चरापले asi अजीम पठाण,पो ना  संजू जाधव पो ना नाथा जगताप पो कॉ नागलोथ पो कॉ कोळेकर यांनी केली आहे.