ब्रेकिंग न्यूज

पप्पू वाडेकर खून खटल्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई... पुणे ग्रामीण ह

14/09/2021 10:44:30  2833   पुणे ब्रेकिंग न्यूज ब्यूरो

पप्पू वाडेकर खून खटल्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई... पुणे ग्रामीण हद्दीत गुन्हेगारी कंट्रोल करण्यासाठी मोठी कारवाई...!!

राजगुरूनगर : राजगुरुनगर येथील पप्पू कल्याण वाडेकर खून खटल्यातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमाप्रमाणे म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पप्पू वाडेकर याच्यावर पिस्तुलातून गोळ्या जोडून तसेच दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास राजगुरूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव हे करत होते.या गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी यापूर्वीदेखील टोळी तयार करून गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी आरोपी नामे १) मिलिंद विठठल जगदाळे वय ३१ वर्ष, २) विजय उर्फ बंटी विठठल जगदाळे वय ३० वर्षे दोघे रा. सातकररथळ ता. जि. पुणे. ३) जितेंद्र पंढरीनाथ गोपाळे वय ३१ वर्षे,रा.तिन्हेवाडी रोड जय गणेश दर्पन सोसायटी, डी. विंग पहीला मजला, फ्लॅट नंबर. १०४, राजगुरुनगर ता. खेड जि. पुणे ४) मयूर विठठल जगदाळे, वय ३२ वर्ष रा सातकरस्थळ ता. खेड जि. पुणे. ५) प्रविण उर्फ मारुती रमेश थिगळे वय ३२ वर्षे, रा. थिगळस्थळ,ता. खेड, जि. पुणे, ६) तौसिफ बशिर शेख, वय २१ वर्षे, रा.दोंदे, ता.खेड जि. पुणे यांना याप्रकणात शिताफिने अटक केली होती. तसेच याप्रकरणातील इतर ०३ आरोपी गुन्हा घडलेपासुन फरार झाले आहेत. तसेच आरोपी नामे ७) पवन सुधीर थोरात रा. मंचर, ता. खेड, जि. पुणे. यास मंचर पोलीस स्टेशन येथे दाखल असणा-या खुनाच्या गुन्ह्यातून अटक करण्यात आली होती.

सदर गुन्हयाचे तपासात सदर आरोपींनी टोळीप्रमुख तौसिफ बशिर शेख रा. दोंदे ता.खेड जि. पुणे याचे नेतृत्वा खाली संघटीत टोळी तयार करून टोळीची दहशत निर्माण करून टोळी प्रमुख याने स्वःता व टोळीतील वेगवेगळे सदस्यांचे मार्फत अनेक गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच त्यांनी . स्वताचे टोळीची दहशत निर्माण करून गुन्हयांची शृंखला चालुच ठेवली असून त्यातुनच ते स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत असून जीवन जगत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांचे या कृत्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले असून खेड, आंबेगाव तालुक्यात व परीसरामध्ये त्यांची दहशत निर्माण झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने मा. पोलीस अधिक्षक सो. अभिनव देशमुख, पुणे ग्रामीण यांचे आदेशानुसार पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांनी तात्काळ सदर आरोपीतांचे विरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ चे कलम २३ (१) (अ) प्रमाणे मा. मनोज लोहीया विषेश पोलीस महानिरीक्षक सो, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांचेकडे मा. पोलीस अधिक्षक सो, पुणे ग्रामीण यांचे मार्फत प्रस्ताव सादर केला. त्यास मा मनोज लोहीया, विशेष पोलीस महानिरीक्षक सो, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांनी मंजुरी दिल्याने सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ मे कलम ३(१)(i) (ii). ३ (४) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. पोलीस अधिक्षक सो अभिनव देशमुख, व अपर पोलीस अधिक्षक, विवेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलीस अधिकारी, अनिल भाने सो, हे करीत आहेत.