ब्रेकिंग न्यूज

स्वराज्य मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला किवण्यातील भीमा नदीचा गणेश वि

20/09/2021 11:24:18  67   अँड.नीलेश आंधळे

स्वराज्य मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला किवण्यातील भीमा नदीचा गणेश विसर्जन घाट स्वच्छ.. 

गणेशोत्सव थाटामाटात साजरा करून आज दि. १९ ऑक्टोबर रोजी अनंत चतुर्दशी च्या दिवशी आपल्या घरचे, मंडळाचे गणपती विसर्जन केले जात होते. गणपती विसर्जन करीत असताना नागरिकांनी निर्माल्य तसेच अक्षरशः कचरा देखील विसर्जनाच्या घाटावर अस्ताव्यस्त टाकलेला होता. हे पाहून स्वराज्य मित्र मंडळ च्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वतः सर्व एक टेम्पो भरून निर्माल्य व कचरा उचलून परिसर साफ केला. आपले शहर आपणच साफ ठेवले पाहिजे व नदी पात्र स्वच्छ असावे ह्या उद्देशाने स्वतः हे समाजकार्य केले. तरुणांच्या ह्या उपक्रमाचा आदर्श सर्व नागरिकांनी घेतला पाहिजे .

या प्रसंगी स्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष मच्छिंद्र राक्षे, उपाध्यक्ष अमर भाऊ टाटीया, नगरसेवक राहुल आढारी, नगरसेवक शंकर राक्षे, रोहिदास दौंडकर, ऍड. महेश तांबे, प्रकाश शिंदे, कमलेश टाटीया, सोन्या करपे, वैभव राक्षे, सोन्या राक्षे, राहुल नाईकरे, प्रभू नाटेकर उपस्थित होते.