*आळेफाटा येथील मुक्ताई मंदिरात दरवर्षी प्रमाणे भक्तिमय वातावरणात दुर्गा सप्तशती पठण उपक्रम*
दि.१२. आळेफाटा येथील मध्यवर्ती ठिकाणावर आळेफाटा वासियांचे ग्रामदैवत मुक्ताई मातेचे मंदिर आहे. या मंदिरात परिसरातील महिलांकडून दुर्गा सप्तशती पाठाचे दरवर्षी आयोजन केले जाते. यामध्ये अनेक भाविक महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. दरवर्षी मंदिराच्या प्रांगणात अन्नदान व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण कोरोना च्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम बंद आहेत.
तरीही सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सेवेकरी महिला मोठ्या भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सवात नऊ दिवस दुर्गा सप्तशती पाठाचे पठण करत असतात.

या दुर्गा सप्तशती पठण उपक्रमात सविता आवटे, पौणिमा गांधी,ज्योती कु-हाडे, रोहिणी कोकाटे, प्रेमलता शुक्ला, विमल वाव्हल, कल्पना गुंजाळ, सुरेखा कासार इत्यादि महिला नियोजन करतात.