ब्रेकिंग न्यूज

अब भला मोठा अजगर आणि तोही चाकण मध्ये... सर्पमित्र बापूसाहेब सोनवणे आणि टीमन

23/10/2021 09:49:24  348   पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो

चाकण :

मनुष्य वस्तीत आले भले मोठे अजगर,वेळ होती रात्री साडे नऊची,चाकण येथील कडाची वाडी येथील गणेश मंदिरासमोर भलामोठ्ठा साप असल्याची माहिती सर्पमित्र प्रफुल्ल गुरव यांना मिळाली एरवी भयाण शांतता असलेला परिसर पण या महाकाय अजगराला पाहण्यासाठी तुडुंब गर्दी,,या गर्दीला भेदत अजगर पुढे पुढे चाल करत होती पण जवळ जाण्याचे धाडस कुणी करत नव्हते,,रोड ची वाहने थांबून पाहत होती, प्रफुल्ल यांच्या मातोश्री ने कॉल करून ही माहिती सर्वांना सांगितली,,,वाऱ्याच्या वेगाने एक एक सर्पमित्र गोळा होऊ लागले,,सर्वात प्रथम सर्पमित्र प्रमोद खामकर यांनी त्याला बस च्या बाजूला असलेल्या गवतातून रेस्क्यू केले व सपाट भूभागावर आणले लगेचच नेचर गार्ड ऑर्गनायझेशन चे सर्पमित्र बापूसाहेब सोनवणे,सर्पमित्र प्रफुल्ल गुरव ,सर्पमित्र विक्रांत चौधरी, सर्पमित्र सोन्या भुजबळ हेही उपस्थित झाले,सर्पमित्र बापूसाहेब सोनवणे सर यांनी प्रमोद खामकर यांनी पकडून ठेवलेल्या अजगराला हाताळले व सापाला शांत केले त्यांच्या तंत्राने अजगर शांत झाले व इतर सर्पमित्रांच्या मदतीने वनविभागाकडे जमा केले

यावेळीं सर्पमित्रांनी  तेथील सर्व उपस्थितांचे प्रबोधन करून सापाची महिती सांगीतली  चाकण पोलीस स्टेशन चे  सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राळे उपस्थित होते जमा होणाऱ्या गर्दीला आटोक्यात आणण्याचे काम साहेबांनी केले व परिस्थिती नियंत्रणात आणली,वनविभागात संबंधित डॉक्टरांनी तपासणी करून व्यवस्थित व तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र दिले,साधारणपने 10 फूट आणि 30 किलो वजनाच्या मादी अजगरालाआज सायंकाळी वनविभागाचे अधिकारी योगेश महाजन व नितीन खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पोतरे व खांडेभराड यांच्या उपस्थितीत सह्याद्री च्या डोंगर रांगेत त्याला सोडून देण्यात आले .शिक्रापूर महामार्गावर गणेश मंदिरासमोर काही ट्रेलर विश्रांती साठी थांबत असतात संबंधित अजगर अशाच एखाद्या ट्रेलर मधून प्रवास करत आले असावे असा अंदाज सर्पमित्रांनी व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.