ब्रेकिंग न्यूज

जलयुक्त शिवार योजनेच्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करणाऱ्या माहिती अधिकार कार्

29/10/2021 06:23:22  497   पुणे ब्रेकिंग न्यूज ब्यूरो

जलयुक्त शिवार योजनेच्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी....

आळंदी : जलयुक्त शिवार योजनेचा भ्रष्टाचाराबाबत तक्रारी अर्ज करून पाठपुरावा करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते पै.बाळासाहेब ऊर्फ मारुती काळूराम चौधरी, रा. पिंपळगाव ( गोलेगाव ), ता.खेड, जि. पुणे यांना माहिती अधिकाराचे काम बंद कर अशी चिठ्ठी लिहून त्यांच्या घरासमोर ठेवून तू अनेक गौण खनिज अनाधिकृत उत्खनन होत असताना संबंधितांवर पंचनामा करून, तक्रारी करून करोडो रुपयांचे दंड भरावे लागले आहेत तुझ्या तक्रारींनी आम्ही वैतागलो आहे. आमच्यावर तुझ्या मुळे उपासमारीची वेळ आली आहे तू सरकारी अधिकाऱ्यांना पोलिसांना माहिती अधिकारात अर्ज करून त्रास देत आहे. ते सुद्धा तुला वैतागले आहेत त्यामुळे तुला संपवण्यासाठी आम्ही हत्यारे आणून ठेवली आहेत.

अशा स्वरूपाचे धमकीचे पत्र त्यांच्या घरासमोर ठेवण्यात आल्याने माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊन त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर वर आला आहे. 

याप्रकरणी बाळासाहेब चौधरी यांनी आळंदी पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ५०६ प्रमाणे तक्रार दाखल केली असून याबाबत सखोल तपास करण्याची मागणी माहिती अधिकार व सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. 

कोण आहेत बाळासाहेब चौधरी ? 

पै. बाळासाहेब उर्फ मारुती काळूराम चौधरी हे गेली अनेक वर्षे समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीचे पदाधिकारी म्हणून काम करत आहेत. तसेच कुस्ती क्षेत्रात देखील राज्यस्तरीय खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष म्हणून देखील काम करत आहेत. यापूर्वी अनधिकृत गौण खनिजाच्या अनेक तक्रारी दाखल करून शासनाला करोडो रुपयांचा दंड चौधरी यांनी वसूल करून दिलेला आहे.

जलयुक्त शिवार जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या, गौण खनिजाचा बाबतीत सातत्याने तक्रारी करून अधिकाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्यास भाग पाडणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकी देऊन त्यांची मुस्कटदाबी करणाऱ्या प्रवृत्तीचे या तालुक्यात काही एक चालु देणार नाही, या तालुक्यात दुसरे सतीश शेट्टी आम्ही होऊ देणार नाही त्यासाठी प्रसंगी आंदोलन करायची वेळ आली तर भीमशक्ती संघटना जिल्हाभर रस्त्यावर उतरेल.... विजुभाऊ डोळस ( जिल्हाध्यक्ष भीमशक्ती संघटना, पुणे जिल्हा )

याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब उर्फ मारुती काळूराम चौधरी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी अशा धमक्यांना मी भीक घालत नसून यापूर्वी देखील अशा अनेक धमक्या आलेल्या आहेत परंतु माननीय अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला माझा भ्रष्टाचाराविरुद्ध चा लढा मी श्वासाच्या शेवटपर्यंत असाच कायम ठेवणार आहे असे त्यांनी सांगितले.

एकंदरीतच लोकशाहीत माहिती अधिकार कार्यकर्ते, व्हिसल ब्लोअर सामाजिक कार्यकर्त्यांचा दबाव गट कार्यरत राहणे ही काळाची गरज आहे.




Vishnu gaikwad patil 29/10/2021 20:01:36

. ़़