14/11/2021 01:16:43
377
पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो
राजगुरूनगर येथे दुर्गा शौर्य प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन...तरुणींचा उस्फुर्त प्रतिसाद ....!!
राजगुरूनगर :
हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन राजगुरूनगर संस्थेच्या वतीने मुली व महिलांच्या सक्षमीकणासाठी येथील महात्मा गांधी विद्यालयात दुर्गा शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आज उद्घाटन झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राजगुरूनगर नगर परिषद मुख्य अधिकारी निवेदिता घारगे होत्या.जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख , राजगुरूनगर सहकारी बँकेच्या संचालक विजया ताई शिंदे , अँड.निलेश आंधळे तसेच संगमनेर येथील हिंदुराजा मर्दानी खेळ आखाड्याचे प्रशिक्षक अमित पवार,कल्पेश गोसावी आदी व्यापीठावर उपस्थित होते.
बदलत्या काळात मुली व स्रीयांवर होणारे अत्याचार लक्षात घेऊन हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन ने या शिबिराचे आयोजन केल्याचे संचालक डॉ.नीलम गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना सांगितले.
सरस्वती, छ्त्रपती शिवाजी महाराज,हुतात्मा राजगुरू,प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन तसेच लाठी काठी पूजन करून कार्यक्रम प्रारंभ झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी फाऊंडेशन अध्यक्ष ॲड. मनिषाताई पवळे ,उपाध्यक्ष बाळासाहेब सांडभोर , एड.निलेश आंधळे,जिल्हा परिषद सदस्य अतुलभाऊ देशमुख, राजगुरूनगर सह.बँक संचालक विजयाताई शिंदे ,प्रशिक्षक अमित पवार यांनी प्रशिक्षणाची गरज आपल्या मनोगतातून मांडली.
राजगुरूनगर नगरपरिषद मुख्य अधिकारी निवेदिता घारगे यांच्या अध्यक्षीय भाषणाने समारोप झाला.
यावेळी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके झाली.
शिबिरासाठी १५० मुली व महिला यांनी नोंदणी केली असून आज उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने मुली,महिला व पालक उपस्थित होते.
पुढील १२ आठवडे शनिवार ,रविवारी हे प्रशिक्षण महात्मा गांधी विद्यालय येथे दिले जाणार आहे.
कार्यक्रम संयोजन हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष ऍड. मनीषा ताई पवळे,उपाध्यक्ष बाळासाहेब सांडभोर,तसेच संचालक डॉ.नीलम गायकवाड,संपदाताई सांडभोर,अमर टाटिया, दिलीप होले,उत्तम राक्षे,संगीताताई तनपुरे,
दत्ता रुके,मिनाक्षी पाटोळे,यांनी केले.
सूत्रसंचालन मधुकर गिलबिले गुरुजी तसेच आभार बाळासाहेब सांडभोर यांनी मानले.