ब्रेकिंग न्यूज

मी तिथे आहे असे समजून न्याय दिला की योग्य होतो.... प्रमुख जिल्हा न्यायाधीश

18/11/2021 08:06:56  108   पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो

मी तिथे आहे असे समजून न्याय दिला की योग्य होतो.... प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख कनेरसर : ग्रामीण डोंगराळ भागात भागातील जनमाणसात कायद्याच्या ज्ञानाचा जागर व्हावा आणि कायद्याच्या अज्ञानामुळे अन्याय होऊ नये यासाठी गावातील आजचे शेळपट उद्याचा योद्धा व्हायला सज्ज व्हा असं आवाहन पुणे जिल्हा मुख्य न्यायाधीश संजय देशमुख यांनी केलं आहे. राजगुरुनगर जिल्हा सत्र न्यायालयाकडून स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवाच्या आयोजन कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही अजुनही अनेकांना कायद्याचे पुर्णतः ज्ञान नाही, त्यामुळे आपल्यातुन अजुनही अज्ञानाच्या अपमानाची फळे आहेत. पण तुमच्यातच कला गुण संपन्नता आहे, त्यामुळे आपल्यातील चांगल्या गुणांचा समाजहितासाठी उपयोग करुन घ्या असं म्हणत प्रमुख जिल्हा न्यायाधिश संजय देशमुख यांनी आपल्या कवितेतून उपस्थितांना संबोधित केलं. आजचा शेळपट उद्याचा योद्धा! पुणे जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश संजय देशमुख यांची साद स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ग्रामीण भागातील नागरिकांसह तरुणांना कायदेविषयक ज्ञानाचा जागर व्हावा यासाठी खेड तालुका बार असोसिएशन, विधी सेवा समिती खेड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त " आजादी का अमृत महोत्सव " या अभियानांतर्गत खेड तालुक्यातील कनेरसर येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित केले होते. यावेळी पुणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधिश संजय देशमुख, सहाय्यक धर्माद्याय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, जिल्हा न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांच्या उपस्थितीत पार हे शिबिर संपन्न झाले. यावेळी बोलताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख साहेब यांनी आपण स्वतः घटनास्थळी आहोत असा विचार केला की न्याय देणे सोपे जाते असे प्रतिपादन केले.