ब्रेकिंग न्यूज

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आंबेगाव तालुका अध्यक्षांनी स्री जन्माचे केले

01/12/2021 19:00:12  207   वैभव काळे पाटील

*अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आंबेगाव तालुका अध्यक्षांनी स्री जन्माचे केले आगळ्यावेगळ्या प्रकारे स्वागत...स्तुत्य उपक्रमाचे होतेय सगळीकडे कौतुक* आंबेगाव तालुक्यातील नारोडी ह्या गावातील शेतकरी कुटुंबातील युवक व अखिल भारतीय मराठा महासंघाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ हुले यांच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी एक कन्या रत्नाचे आगमन झाले. समजासेवेचे व्रत घेतलेल्या हुले यांनी आपल्या मुलीचे नाव रुद्रप्रिया ठेवले असुन तिच्या जन्माचे स्वागत म्हणुन उपजिल्हा रुग्णालय मंचर येथील रुग्णांचे थंडी पासुन संरक्षण होण्यासाठी ब्लँकेटस् चे वाटप केले असुन स्री जन्माचे असे स्वागत करून समाजापुढे एक आगळावेगळा आदर्श घालून दिला असून हुले यांचे वर सगळ्या स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भरत हुले 01/12/2021 21:15:48

समाज सेवक योध्याला मानाचा मुजरा पुढिल वाटचालीस शुभेच्छा