ब्रेकिंग न्यूज

आंबेगाव तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई पेठ गावचा तलाठी हे

16/12/2021 01:24:49  887   वैभव काळे घोडेगाव

आंबेगाव तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई पेठ गावचा तलाठी हेमंत भागवत याच्यावर गुन्हा दाखल..... 

घोडेगाव :  आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे खेड येथील वसंत राजाराम बागल यांची वडिलोपार्जित जमिन खरेदी केली असुन सदर जमिनीचा फेरफार करून सातबारा सदरी नोंद घेण्यासाठी पेठ येथिल तलाठी हेमंत भागवत याने फिर्यादिकडे ६००० रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ४००० हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याने वसंत बागल यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून तलाठी भागवत याच्यावर मंचर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

     सदर गुन्हा ०२/११/२०२१ ते ०९/११/२०२१ रोजी बिकानेर ढाबा व पेठ येथिल तलाठी कार्यालय येथे घडला असल्याची तक्रार केली असुन त्याच्यावर गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीमती अलका सरग पो.नी. व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे हे करत आहेत.