ब्रेकिंग न्यूज

शिरूर प्रीमियर लीग 9 व्या पर्वाचा मानकरी सायमा फार्म तांदळी संघ

11/01/2022 07:07:06  437   योगेश लंघे

शिरूर प्रीमियर लीग 9 व्या पर्वाचा मानकरी सायमा फार्म तांदळी संघ

 

 

पुणे.   जिल्ह्यामध्ये क्रिकेट महर्षी म्हणून ज्यांची ओळख आहे.

असे पै.मल्हारी आप्पा गव्हाणे  ‌,,(अध्यक्ष शिरुर क्रिकेट असोसिएशन)यांच्या प्रेरणेतून चालू झालेली शिरुर प्रीमियर लीग चा फायनल चा थरार आज सणसवाडी येथे पार पडला.यामध्ये सायमा फार्म तांदळी संघाने प्रथम पारितोषिक पटकावून शिरूर प्रीमियर लीगच्या 9 व्या पर्वाचा मानकरी ठरला आहे. तसेच मानसिंग भैय्या पाचुंदकर रांजणगाव संघ दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. ठरला आहे. तर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ग्राम विकास प्रतिष्ठान आहे. चौथ्या क्रमांकासाठी महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा यांनी बाजी मारली आहे फायनल च्या झालेल्या काळजाला भिडणाऱ्या थरांमध्ये मध्ये साय मा फार्म तांदळी संघाने जोरदार मुसंडी मारली असून यामध्ये कर्णधार शरद खोरे आयकॉन अक्षय तावरे व आइडल स्वप्निल भालेराव यांच्या कामगिरीने प्रेक्षकाची मने जिंकली आहेत.

2014 ते 2021  साला पर्यंत आप्पानी मल्हारी आप्पा गव्हाणे या नावाने स्पर्धा आप्पा आयोजित करत असत. पण या वर्षी मात्र आप्पानी स्वताचे नाव न देता. तालुक्याचे नाव देत शिरुर प्रीमियर लीग भरवली. या मुळे आप्पाचे मोठ्या प्रमाणात कौतुक शिरुर तालुक्यातील क्रिकेट खेळाडू व प्रेक्षक करत आहेत. 

 

या स्पर्धेच्या आयोजनामध्ये पै मल्हारी (आप्पा) गव्हाणे (अध्यक्ष शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन) 

श्री यशवंत दादा पाचंगे (उपाध्यक्ष शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन.श्री राहुल दादा पवार (उपाध्यक्ष शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन )ग्रामपंचायत सदस्य जातेगाव बुद्रुक श्री लक्ष्मण दादा गव्हाणे (सचिव शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष पुणे जिल्हा माहिती सेवा समिती) श्री सागर भाई दरेकर खजिनदार शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन उपसरपंच सणसवाडी श्री सागर गायकवाड खजिनदार शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन माजी ग्रामपंचायत सदस्य तळेगाव ढमढेरे श्री प्रवीण गव्हाणे सदस्य शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन उद्योजक. त्यांच्या खांद्यावर होती. शिरूर तालुक्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांकडून सर्व प्रेक्षकांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.