ब्रेकिंग न्यूज

खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेंद्र शिंदे तर सचिवपदी किरण खुडे..

09/02/2022 12:26:20  138   पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो

खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेंद्र शिंदे तर सचिवपदी किरण खुडे.......

राजगुरुनगर : (वार्ताहर) : खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेंद्र शिंदे तर सचिवपदी किरण खुडे यांची निवड करण्यात आली.

        खेड तालुका पत्रकार संघाच्या वार्षिक बैठकीत नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्र शिंदे यांना सर्वानुमते कार्यकारिणी निवडीचे अधिकार देण्यात आले होते, त्यानुसार पत्रकार संघाच्या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष महेंद्र शिंदे, कार्याध्यक्ष निवृत्ती नाईकरे, उपाध्यक्ष चंद्रकांत मांडेकर, एम.डी. पाखरे, आदेश भोजने, सचिव किरण खुडे, सहसचिव इसाक मुलाणी, खजिनदार तुषार मोढवे, सहखजिनदार सुभाष लोहोट, पत्रकार परिषद समन्वयक रामचंद्र सोनवणे, प्रसिध्दी प्रमुख सदाशिव आमराळे, कायदेशीर सल्लागार अॅङ निलेश आंधळे, सल्लागार राजेंद्र सांडभोर, कोंडीभाऊ पाचारणे, चाकण विभाग प्रतिनिधी भानुदास पऱ्हाड, कार्यकारीणी सदस्य रोहिदास गाडगे, आदेश टोपे, कुंडलीक वाळुंज.

       भावी काळात पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, पत्रकारांसाठी कार्यशाळा, आरोग्य शिबिरे आदी उपक्रम राबविणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले.

      याप्रसंगी माजी अध्यक्ष संदीप मिरजे आणि गणेश फलके, अविनाश दुधावडे, विद्याधर साळवे, श्रीमती वनिता कोरे,बाळासाहेब सांडभोर दत्ता भालेराव राजेंद्र मांजरे, नंदकिशोर मांदळे, राजेंद्र लोथे, तुकाराम बोंबले, रवी साकोरे, नाजिम इनामदार, संजय शेटे, सुनिल थिगळे, अशोक कडलग, रुपेश बुट्टे , रोहीदास होले, शरद भोसले, सुभाष लोहोट , किशोर गिलबिले, विजय मुऱ्हे आदी उपस्थित होते.