ब्रेकिंग न्यूज

आंबेगाव तालुक्यातील अजुन एक सरकारी बाबु लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्

09/02/2022 23:57:19  362   पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो

आंबेगाव तालुक्यातील अजुन एक सरकारी बाबु लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.....

      आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथिल मंडल अधिकारी योगेश रतन पाडळे (वय ३८) तसेच खाजगी सहायक लक्ष्मण सखाराम गायकवाड (वय ६१) यांनी घोडेगाव येथील तक्रारदार इसमाच्या मामाच्या मुलाने जमीन खरेदी केली असुन तिची नोंद करून फेरफार मंजुर कण्यासाठी १० हजार रुपयाची लाच मागितली होती.

      लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याची शहानिशा करून सापळा रचला व तहसील कार्यालयासमोर असलेल्या हॉटेल मध्ये योगेश पाडळे याला व खाजगी सहायक लक्ष्मण गायकवाड याला १० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले असुन घोडेगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अलका सरग पुढील तपास करत आहेत.

      वरिस्ट अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालुन त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्तीची ताकीद देऊन जातीने लक्ष घालुन सामान्य लोकांची कामे वेळेवर का होत नाहीत किंवा झालेली कामे कोणत्या पद्धतीने होतात किंवा कसे ह्याचीही शहानिशा करण्याची नितांत गरज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.