आळेफाटा येथे सौमित्र महिला बचत गटाचे रसवंती गृह एक पाऊल व्यावसायाकडे.....
महिलांचे सक्षमीकरण होण्याचे हेतुने वडगाव आनंद सौमित्र महिला बचत गटाने आळेफाटा येथे रसवंतीगृह सुरू केले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) अंतर्गत समुहातील महिलांचे सक्षमीकरण करण्याचे हेतुने या अंतर्गतच सौमित्र महिला बचत गटाने आळेफाटा येथे रसवंतीगृह सुरू केले आहे.
या नूतन उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी आळेफाटा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरिक्षक रागिणी कराळे, जुन्नर तालुका बचत गट समन्वयक सुनिता सुवर्णकार, ग्रामपंचायत सदस्या वैशाली देवकर, शिवनेरभूषण सुंदरताई कु-हाडे गोमाता पतसंस्था अध्यक्ष सुरेश गडगे जनमंगल पतसंस्था अध्यक्ष सचिन वाळुंज जिल्हा वारकरी परिषद उपाध्यक्षा अनुराधा गडगे, संगिता तळेकर,अमृता गडगे, ज्योती भुजबळ, लिला बटवाल, कविता गडगे, जनाबाई गडगे, मिरा लाड, ज्योती गडगे, शोभा गडगे, रोहिणी गडगे, जयश्री गडगे यांचे उपस्थितीत होते.