24/03/2022 10:46:16
1901
शुभम दळवी आळेफाटा
आळेफाटा येथे पुणे नाशिक महामार्गावर शुभम तारांगण समोर एसटी पिक अप गाडीचा भीषण अपघात.....
दि.२४. पुणे नाशिक महामार्गावर सकाळी ९ च्या सुमारास आळेफाटा येथे शुभम तारागण या रहिवाशी सोसायटीच्या गेटसमोर एसटी क्रमांक Mh.14.BT. 4079 आणि माल वाहतूक पिक अप Mh.48.Bm.6014 या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये पिक अप चालक सूरज सरदार (डहाणू) वय _३५ हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत. तसेच एसटी मधील प्रवाश्यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत. सर्व जखमींना आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. घटना स्थळी तत्काळ आळेफाटा पोलीस स्टेशन चे कर्मचारी दाखल होऊन महामार्गाची वाहतूकोंडी सुरळीत केली.
