ब्रेकिंग न्यूज

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दिनानिमित्त ह्योसंग टी अँड डी इंडिया प्रायव्हेट लि

30/03/2022 10:18:41  149   योगेश लंघे पाटील

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दिनानिमित्त ह्योसंग टी अँड डी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड खेड सिटी या कंपनीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 107 रक्तदात्यांचा सहभाग .... 

 

खेड सिटी राजगुरुनगर येथे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त  ह्योसंग टी अँड डी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने गुरुवारी ता. 24 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात 107 रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला 

 

या शिबिराचे आयोजन  ह्योसंग टी अँड डी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड खेड सिटी येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन डायरेक्टर संग चूल शिन , परचेस हेड मुरलीधर देइवनानी, HR विभागातर्फे दादासाहेब थोरात अनिल चव्हाण सेफ्टी ऑफीसर आनंद पवार  यांच्या शुभहस्ते करण्यात आले

 

याप्रसंगी कंपनीतील सर्व कर्मचारी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

 

सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे शासनामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे आव्हान केले होते त्यामुळे ह्योसंग टी अँड डी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड खेड सिटी  ने राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले  चाकण ब्लड सेंटर ने रक्तसंकलन केले असून शिबिराची सर्व व्यवस्था सेफ्टी ऑफीसर आनंद पवार अनिल चव्हाण श्री विक्रम करंजखेले श्री आकाश जगताप यांनी पाहिली. शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र भेट देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल चव्हाण सूत्रसंचालन आनंद पवार व आभार विक्रम करंजखेले यांनी मानले