ब्रेकिंग न्यूज

आळेफाटा वडगाव आनंद येथील बारा वर्ष मुलाचा पोहण्यासाठी गेला असताना बुडून दुर

14/04/2022 18:39:05  705   शुभम दळवी

*आळेफाटा वडगाव आनंद येथील बारा वर्ष मुलाचा पोहण्यासाठी गेला असताना बुडून दुर्दैवी मृत्यू*

दि.१४.आळेफाटा वडगाव आनंद येथील वाळुंज वाडा शिवारात असलेल्या ओढ्यामध्ये मित्रांसमवेत गेलेल्या एका बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.

ही दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. साहिल राजू लोखंडे (वय १२ वर्षे) वडगाव आनंद. या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

 पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन सुरू असून या कालव्याद्वारे वडगाव आनंद शिवारातील ओढ्याना पाणी सोडण्यात आले आहे.दरम्यान आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साहिल व त्याचे मित्र पोहण्यासाठी गेले होते. त्याच वेळी तो बुडू लागल्याने त्या ठिकाणी असलेल्या साहिल त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला यावेळी बाजूला असलेल्या नागरिकांनी साहीलला पाण्याबाहेर काढले व त्यास तात्काळ उपचारासाठी आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता याबाबत गोरक्ष मारुती लोखंडे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात माहिती दिली असून पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केले असून पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत.