ब्रेकिंग न्यूज

देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आमदार पै महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्व

19/05/2022 02:23:51  737   योगेश लंघे पाटील

देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आमदार पै महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली  पिंपरी चिंचवड मध्ये.  करोडोंची बक्षिसे

महाराष्ट्र भर या स्पर्धेचा बोलबाला

 

 शर्यतीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवल्यानंतर आता भोसरी मध्ये भाजप आमदार महेश दादा लांडगे यांनी देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत जाधवाडी चिखली येथे 28 ते 31 मे या दिवसासाठी आयोजित केली आहे .तीन चार चाकी .आणि एकशे तीन दुचाकी. बावीस तोळे सोने. दहा चांदीचा गदा. यासह लाखो रुपयांच्या रोग बक्षिसांची लयलूट या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. दीड हजार बैलगाडे यात भाग घेणार असून ही स्पर्धा पाहण्यासाठी लाखो शौकीन येणार असल्याचे आयोजक मा महापौर राहुल दादा जाधव यांनी सांगितले. केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री प्रकाश जावडेकर  यांच्या शुभहस्ते 28 तारखेला सकाळी ठीक सात वाजता शर्यतीचे उद्घाटन होईल.

 

दुसऱ्या दिवशी माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत. आणि विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर. तर तिसऱ्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील हे शर्यती उपस्थित राहणार आहेत.

 

बक्षीस वितरण 31 तारखेला सायंकाळी साडेसात वाजता माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणीस आणि श्री क्षेत्र नारायणपूर चे अण्णा महाराज यांच्या हस्ते होणार आहे .जवळपास पावणेदोन कोटी रुपयांच्या बक्षीस व दोन कोटी रुपये खर्च या भव्य शर्यती ला होणार आहे. या सर्व स्पर्धेचे नियोजन महापौर राहुल दादा जाधव व त्यांचे सहकारी करत आहेत. एक जेसीबी बोलेरो गाडी. एक ट्रॅक्टर व 103 दुचाकी. अशी बक्षिसांची लयलूट या स्पर्धेमध्ये होणार आहे. ह्या स्पर्धेचे लाइव्ह प्रक्षेपण पुणे ब्रेकिंग न्यूज वर होणार आहे .च्या स्पर्धेबद्दल पूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात चर्चा असून या स्पर्धेमध्ये लाखो लोकांची उपस्थिती होणार असल्याने या स्पर्धेची उत्सुकता पूर्ण देशभर आहे. आलेल्या सर्व गाडा मालकांना टी-शर्ट कॅप व छत्री देखील वाटप करण्यात येणार असून घाटांमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक व गाडा मालकांना जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व स्पर्धा लाईव्ह मोठ्या एलईडी स्क्रीन वर देखील दाखवण्यात येणार आहे. ह्या स्पर्धे मध्ये पुर्ण ताकत झोकून कार्यकर्ते कामाला लागले असून पूर्ण महाराष्ट्र  या स्पर्धेमुळे ढवळुन निघाला आहे .महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मधून बैलगाडा शौकीन या स्पर्धेमध्ये उपस्थित राहणार असून यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. बैलगाडा शौकीन मध्ये गाडा  मालकांमध्ये बैलगाडा शर्यतीचे उत्सुकता मोठ्या प्रमाणात असल्याने ह्या बैलगाडा शर्यती ची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर आहे हे सर्व स्पर्धेचे घाटा चे नियोजन हे मा महापौर राहुल दादा जाधव हे करत असून रात्रंदिवस कार्यकर्ते झटत असल्याचे दिसत आहे.