ब्रेकिंग न्यूज

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यातर्फे उद्या उपाधिक्षक भुमी अभि

22/05/2022 19:35:48  393   पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यातर्फे उद्या उपाधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय येथे भूमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात जाहीर धरणे आंदोलन.....

राजगुरुनगर : शेतीच्या शासकीय मोजणी साठी निर्माण करण्यात आलेले उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय नेहमीच वादात राहिलेले यापूर्वी देखील आपण ऐकलेले आहे. याच कार्यालयाने अनागोंदी कारभार केलेला आहे असा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने या विरोधात जाहीर धरणे आंदोलन उद्या दिनांक २३/०५/२२ रोजी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्या कार्यालयासमोर पुकारले आहे.

सदर आंदोलनात हुतात्मा राजगुरु स्मारकातील अतिक्रमण, न्यायालयाचा निकाल होऊन देखील चौथा सर्वेअर यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्याबाबत, बेकायदेशीर मोजन्या, शेतकरी इंद्रभान बोर्डे यांच्याशी झालेली अरेरावी याबाबत न झालेली कुठलीही कारवाई, श्री विक्रम विजय सांडभोर यांचे तक्रारीवरून माननीय उपविभागीय अधिकारी खेड यांनी निकाल देऊन देखील कोणतीही कारवाई न झाल्याबाबत असे वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन सदरचे आंदोलन होणार आहे.

या आंदोलनाच्या वेळी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाबाबत अजून देखील तक्रारी असतील तर आंदोलन प्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव हरेश भाई देखणे तसेच संपर्कप्रमुख आसिफभाई शेख यांनी केले आहे.

आता या आंदोलनाबाबत उपाधीक्षक श्री शिंदे साहेब काय भूमिका घेतात हे पुढील काळात पहावे लागणार आहे.
ज्ञानेश्वर घोलप 22/05/2022 21:36:47

तुमच्या U Tube चॅनेलला शुभेछ्या.