ब्रेकिंग न्यूज

श्रीनाथ मेटल्स, खेडसिटी, कनेरसर यांच्या वतीने मुक्या जनावरांना चारा वाटप

23/05/2022 18:39:42  199   पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो

श्रीनाथ मेटल्स, खेडसिटी, कनेरसर यांच्या वतीने मुक्या जनावरांना चारा वाटप....

भिमाशंकर : कडाक्याच्या उन्हाळ्यात गोशाळेतील मुक्या जनावरांना चाऱ्याची गरज असल्याने श्री क्षेत्र भीमाशंकर येथील "श्री समर्थ गोशाळा" येथे श्रीनाथ मेटल्सचे एम.डी. श्री बाळासाहेब पाचारणे यांच्या माध्यमातून आज दोन टन  मुरघास खाद्य पोहोच करण्यात आले.

गेल्या ४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या जय गो माता प्रतिष्ठाण मार्फत भीमाशंकर येथे गोशाळा चालवण्यात येते. येथे कत्तलीपासून वाचविलेले तसेच वृद्ध, अपंग गोवंश यांचे संगोपन केले जाते. सध्या गोशाळेत ६५ लहान मोठे गोवंश असल्याचे गोशाळेचे अध्यक्ष बाळासाहेब शंकर कौदरे यांनी सांगितले.

 
अनिल महादेव सातकर 24/05/2022 12:06:32

अतिशय छान उपक्रम राबवत आहे वाचून आनंद वाटला तुम्हाला आणि तुम्ही हाती घेतलेल्या कार्याला मनापासून शुभेच्छा