ब्रेकिंग न्यूज

ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे संतवाडी कोळवाडी ह्या शैक्षणिक संस्थेचा प्रल

04/06/2022 21:01:55  162   शुभम दळवी आळेफाटा

ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे संतवाडी कोळवाडी ह्या शैक्षणिक संस्थेचा प्रलंबित गायरान जागेचा प्रश्न मार्गी...

ग्रामस्थ व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण,,,,,,

आळेफाटा पुणे दि ३ जुन

जुन्नर तालुक्यातील अग्रस्थानी व नामांकित असलेली शैक्षणिक संस्था ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे संतवाडी कोळवाडी च्या सन 1988 पासून ताब्यात असलेली सरकारी जमीन आज महाराष्ट्र राज्य शासन महसूल विभाग यांनी  (शासन ज्ञानप क्र 3414/प्र क्र201/ज-5) शासन नियमानुसार नियमित केले, याबाबत संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुऱ्हाडे यांनी सदर जमिनीचा प्रलंबित प्रश्न सन 2012 पासून आम्ही सर्व तत्कालीन पदाधिकारी व संचालक प्रयत्न करत होतो, संस्थेने 2019 पासून पुन्हा ह्या प्रकरणी शासन दरबारी पाठपुरावा करून शासनाच्या महसूल विभागाकडून आज रीतसर 125 आर क्षेत्र संस्थेस प्राप्त करून दिले. ह्या कामी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील आमदार अतुलशेठ बेनके तसेच माजी व विद्यमान संचालक मंडळ, सभासद, ग्रामस्थ, आळे संतवाडी कोळवाडी गावचे माजी व विद्यमान सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, विविध शासकीय अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त, विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व संस्थांचे पदाधिकारी तसेच माजी विद्यार्थी संघ मुंबई व पुणे यांचे सहकार्य लाभले अशी माहिती दिली

ह्या जमिनीमुळे संस्थेस नवनवीन व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा तसेच नवीन इमारत उभारणी करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही अध्यक्ष भाऊसाहेब कुऱ्हाडे यांनी सांगितले

तर आळे संतवाडी कोळवाडी गावातील ग्रामस्थ व सभासद यांनी संस्थेचे अध्यक्ष भाउदादा कुऱ्हाडे व संचालक मंडळ यांचे ह्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल भरभरून कौतुक केले आहे व गावात व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अध्यक्ष भाऊसाहेब कुऱ्हाडे यांनी सर्वांचे ह्या कामी सहकार्याबद्दल आभार मानले असून संस्थेची इतरही प्रशासकीय प्रलंबित कामे लवकर मार्गी लागणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच संस्थेचे सभासद मी व माझे सहकारी संस्थेच्या हितासाठी जो निर्णय घेतात त्याला सर्वजण सभासद नेहमीच एकमताने पाठींबा देत असतात आणि संस्थेच्या हितासाठी सर्व सभासद हे माझ्या पाठीशी ठाम उभे असतात, सभासद यांचा माझ्यावरील प्रचंड असलेल्या विश्वासामुळे हे काम करू शकलो शेवटी संस्थेचे सभासदच संस्थेचा गाभा आहे असेही अध्यक्ष भाऊसाहेब कुऱ्हाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले