ब्रेकिंग न्यूज

सिंहगडावर पर्यटकांच्या संकटसमयी, बजरंग दलाची धाव...

13/06/2022 14:49:50  80   अँड. निलेश आंधळे

पर्यटकांच्या संकटसमयी, बजरंग दलाची धाव.......

 पुणे : १२ जून २०२२_ 

रविवार किंवा सुटीचा दिवस म्हटलं की किल्ले सिंहगडावर हजारो पर्यटकांची गर्दी जमते. 

रविवार दि १२ जून २०२२ रोजी अशीच गर्दी जमली होती. पर्यटक सिंहगडावर विविध  ठिकाणी सेल्फी काढत असतात. 

अश्याच दोन पर्यटकांची मधमाश्यांच्या पोळ्याबरोबर सेल्फी काढायची हौस अनेकांना महागात पडली. 

मधमाश्यांच्या पोळ्यासोबत सेल्फी काढण्याच्या नादात, त्यांचा पोळ्याला धक्का लागला आणि ते पोळे खाली पडले. 

पोळे पडल्यामुळे मधमाश्यांनी त्या पर्यटकांवर हल्ला चढवला आणि पाहता पाहता त्या माश्या सिंहगडाच्या अन्य भागात पसरू लागल्या आणि अन्य पर्यटकांवर हल्ला चढवू लागल्या. 

या हल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील ४ जण बेशुद्ध पडले त्या कुटुंबामध्ये असणारी २ वर्षाची मुलगी गोंधळून गेली होती. 

त्याचप्रमाणे अन्य  काही युवक युवती देखील या हल्ल्यामुळे अत्यावस्थ झाले होते.

याच वेळी किल्ले सिंहगडावर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने, श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम सुरु होता, कार्यक्रम ऐन रंगात असताना वरील दुर्घटनेची माहिती आयोजकांना समजली, आयोजकांनी एकीकडे कार्यक्रम आटोपता घेतला तर दुसरी कडे विश्व हिंदू परिषदेचीच युवा संघटना असणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घटना स्थळी धाव घेतली. त्यातील श्री. सचिन कांबळे यांनी २ वर्षाच्या मुलीला मधमाश्यांच्या तावडीतून सोडवले आणि सुरक्षित स्थळी पोहोचवले. हे करत असताना श्री कांबळे भोवती मधमाश्या मोठ्याप्रमाणात घोंगावत होत्या. 

सदर पर्यटकांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक आहे हे जाणून, विश्व हिंदू परिषदेची कार्यक्रमस्थळी असणारी रुग्णवाहिका तत्परतेने सिंहगड वाहनतळापाशी तयार ठेवण्यात आली. 

बजरंग दलाचे कार्यकर्ते त्या सर्व पर्यटकांना तातडीने उपलब्ध चादर, बेडशीट आणि जे साहित्य मिळेल त्यांची झोळी करून वाहनतळापर्यंत  हलवण्यात येत असताना 

सिंहगडाच्या पायऱ्यांवरून ये जा करणाऱ्या  प्रवाश्याना वाट मोकळी करण्याचे आवाहन देखील करत होते.

सदर रुग्णांना खेड शिवापूर, किरकिटवाडी आणि अन्य ठिकाणच्या इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले. त्यातील गंभीर परिस्थिती असणारे कुटुंब शुद्धीत येईपर्यंत बजरंग दलाचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेचे अधिकारीगण इस्पितळात हजर राहिले होते. 

आता बहुतेक रुग्णांची तब्ब्येत स्थिर असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. 

बचाव कार्यामध्ये संपत चरवड, तुषार दखणे, चेतन घोडके, सचिन कांबळे, विनोद घोडेराव, श्रीकांत चिल्लाळ, समीर रुपदे, ओमकार निंबाळकर, नितीन महाजन, सचिन भोज्जा, सिद्धेश्वर पेंटर, रवी मरल, धनंजय गायकवाड, दिनेश लाड, गौरव मळेकर, हर्ष ओसवाल, कुणाल जगताप, सर्वेश नातू आदी बजरंगीनी महत्वाची कामगिरी बजावली.

स्थानिक माजी सरपंच अमोल पढेर आणि त्यांचे सहकारी, विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण यांची मोलाची साथ मिळाली. 

समयसूचकता, तत्परता यांचे दर्शन घडवून पर्यटकांच्या संकटसमयी धाव घेणाऱ्या बजरंग दल संघटनेचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे सिंहगडावरील स्थानिक व्यापारी, उपस्थित पर्यटक यांचेकडून कौतुक केले जात आहे.