ब्रेकिंग न्यूज

मराठी शाळा जगवण्यासाठी एक अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत....

15/06/2022 22:31:47  262   शुभम दळवी आळेफाटा

मराठी शाळा जगवण्यासाठी एक अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत....

अन्न वस्त्र निवारा या जश्या मानव जातीच्या प्रमुख गरजा आहेत , तसेच कलियुगात हक्काचे शिक्षण हे देखील मानवजातीची गरज बनली आहे. कारण शिक्षणाने प्रगती साधता येते आणि वैचारिक परिस्थिती उंचावते. 

शिक्षणाला मात्र अजिबात वय नसते वयाच्या कितव्या वर्षी आपण  शिक्षण पूर्ण करू शकता.

शिक्षण आत्मसात करण्यासाठी आणि चांगले शिक्षण देण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे उपक्रम राबविले जातात. असाच काहीसा उपक्रम संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा गावच्या शाळा व्यवस्थापन समितीने तसेच ग्रामस्थांनी केला आहे. 

सध्या राज्यांमध्ये नव्हे तर संबंध देशांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे वारे वाहत आहे. शहरी भागांमध्ये गलेलठ्ठ पगार असणाऱ्या पालकांनी तसेच उच्चभ्रू लोकांनी या शाळांना मोठे केले आहे. मात्र आजही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम या राज्य सरकारच्या मराठी शाळा करत आहेत याच वर्षी यु पी एस सी चा निकाल पाहता मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या जवळपास सोळाशे विद्यार्थी यूपीएससी च्या परीक्षेमध्ये मध्ये पास झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व शाळा बंद झाल्या होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आणि याच गोष्टीचा विचार करता आंबीखालसा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी तसेच शाळा व्यवस्थापन समिती विद्यमान अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून पहिलीच्या विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे तसेच उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी एक नव्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत आयोजित करण्यात आले होते.इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या आणि शाळेचा पहिलाच दिवस असलेल्या तसेच सर्व विद्यार्थ्यांचे ट्रॅक्टर मधून पारंपारिक वाद्य वाजत गाजत तसेच लेझीम पथक याद्वारे मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीत विद्यार्थी तसेच पालक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा तसेच गुणवत्ता वाढावी यासाठी शाळा व्यवस्थापन समिती चे विद्यमान अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक तसेच ग्रामस्थ अपार मेहनत करत आहे. या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे. जसे  इंग्लिश स्कूल मध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक आग्रही असतात तसेच  आपल्या मराठी शाळांत देखील असावेत.  जेणेकरून या आपल्याच शाळांना एक नव संजीवनी प्राप्त होईल असे मत यावेळी सर्व शिक्षक कर्मचारी वृंदाने व्यक्त केले .