ब्रेकिंग न्यूज

शिवाजीराव आढळराव यांना पुणे शहरातून लढण्याची ऑफऱ. खा. आढळराव पाटील नाराज.

06/07/2022 19:45:35  5552   योगेश लंघे पाटील

शिवाजीराव आढळराव यांना पुणे शहरातून लढण्याची ऑफऱ. खा. आढळराव पाटील  नाराज. पुणे जिल्ह्यात  भुकंप होण्याची शक्यता? 

पुणे, दि. ६ (पुणे ब्रेकिंग न्यूज) : लोकसभा निवडणुकीला अडीच वर्षे उरली आहेत. शिरूरचे माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढाळराव-पाटील हे जनतेत लोकप्रिय नेते आहेत. त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव आम्ही त्यांच्यासमोर ठेवला आहे. असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. संभाव्य महाविकास आघाडीच्या जागावाटपात पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचे शिवसेनेने या निमित्ताने सांगितले आहे. तसेच आढळरावांना रस असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागाही राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचेही या `ऑफर`मधून दिसून येत आहे.

मंगळवारी मुंबई येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवाजीराव आढळराव पाटील यांनी `मातोश्री` निवास्थानी भेट घेतली. यावेळी संजय राऊत, खासदार विनायक राऊत, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, माजीमंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, आदेश बांदेकर, जुन्नरचे माजी आमदार जिल्हा प्रमुख शरद सोनावणे उपस्थित होते.

शिरूर लोकसभेमध्ये सध्या खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचे मोठे वर्चस्व आहे.त्या  मुळे  शिरुर लोकसभा सोडून पुणे च्या लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवतील ही शक्यता नाही असे तरी जाणकारांचे मत आहे.

या सर्व घडामोडींमुळे खासदार

 शिवाजी आढळराव पाटील प्रचंड प्रमाणात नाराज असून ते  वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते हे सर असंच झालं तर उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये मा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं मोठं प्रस्थ आहे

दरम्यान, संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ”आम्ही आढळराव पाटील यांना गेल्या काही महिन्यांपासून पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा आग्रह करत आहोत. मात्र, त्यांनी अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यांची लोकप्रियता पाहता, आम्हाला खात्री आहे की ते पुण्याची जागा जिंकतील.”

याबाबत आढळराव पाटील म्हणाले, बैठकीत संजय राऊत यांनी मला पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करण्यास सुचविले आहे. मात्र, मी त्यांना शिरूरची जागा पसंत करणार असल्याचे सांगितले. मला पुण्याच्या जागेवर नाही तर शिरूरच्या जागेत रस आहे, असेही त्यांना स्पष्ट केले आहे. पण राऊत यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला होता, हे खरे आहे. पक्ष आग्रह धरत असेल तर मी पुण्याच्या जागेबाबत विचार करेल, असेही त्यांनी सांगितले
Omkar langhe 06/07/2022 20:49:38

Adhal rav sahebani shirur loksabhetsch ubhe rhav

संजय कैलास गाडगे 07/07/2022 05:14:35

आढळराव पाटीला शिरूर मतदार संघातूच निवडणूक लढवावी ते शिवसेनेतू प्रचंड मतांनी निवडून येतील ही जगा राष्ट्रवादी ला सोडून शिवसेनेचे मोठे नुकसान होईल कार्यकर्ते खचतील कट्टर बाळासाहेबाचा शिवसैनिक

संजय कैलास गाडगे 07/07/2022 05:14:38

आढळराव पाटीला शिरूर मतदार संघातूच निवडणूक लढवावी ते शिवसेनेतू प्रचंड मतांनी निवडून येतील ही जगा राष्ट्रवादी ला सोडून शिवसेनेचे मोठे नुकसान होईल कार्यकर्ते खचतील कट्टर बाळासाहेबाचा शिवसैनिक

संजय कैलास गाडगे 07/07/2022 05:16:55

आढळराव पाटीला शिरूर मतदार संघातूच निवडणूक लढवावी ते शिवसेनेतू प्रचंड मतांनी निवडून येतील ही जगा राष्ट्रवादी ला सोडून शिवसेनेचे मोठे नुकसान होईल कार्यकर्ते खचतील कट्टर बाळासाहेबाचा शिवसैनिक

संजय कैलास गाडगे 07/07/2022 05:16:57

आढळराव पाटीला शिरूर मतदार संघातूच निवडणूक लढवावी ते शिवसेनेतू प्रचंड मतांनी निवडून येतील ही जगा राष्ट्रवादी ला सोडून शिवसेनेचे मोठे नुकसान होईल कार्यकर्ते खचतील कट्टर बाळासाहेबाचा शिवसैनिक

संजय कैलास गाडगे 07/07/2022 05:17:47

आढळराव पाटीला शिरूर मतदार संघातूच निवडणूक लढवावी ते शिवसेनेतू प्रचंड मतांनी निवडून येतील ही जगा राष्ट्रवादी ला सोडून शिवसेनेचे मोठे नुकसान होईल कार्यकर्ते खचतील कट्टर बाळासाहेबाचा शिवसैनिक

संजय कैलास गाडगे 07/07/2022 05:19:25

आढळराव पाटीला शिरूर मतदार संघातूच निवडणूक लढवावी ते शिवसेनेतू प्रचंड मतांनी निवडून येतील ही जगा राष्ट्रवादी ला सोडून शिवसेनेचे मोठे नुकसान होईल कार्यकर्ते खचतील कट्टर बाळासाहेबाचा शिवसैनिक

Aakash Sanjay Fulsundar 07/07/2022 08:32:57

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते डॉ अमोल कोल्हे हेच खासदार म्हणून निवडून यावे त्यांनी राष्ट्रवादी चा बालेकिल्ला डॉ अमोल कोल्हे यांनी राखावा हीच शरद पवार साहेबांकडे मागणी

गणेश चौधरी 07/07/2022 14:58:45

एकच वादा शिवाजी दादा.

अशोक मोढवे 07/07/2022 16:35:50

शिवाजी आढळराव पाटील हे जनतेचे खासदार आहेत सर्व सामान्यांना कधीही उपलब्ध असतात सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत तरी शिरूर लोकसभा सोडु नका दादा आपल्या साठी शिरूर च

Ramesh jejurkar 11/07/2022 22:40:55

शिरूर लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षा तून निवडणूक लढवावी. संपर्क चागला आहे काम आहे .विजयी होतील.

रभाजी यशवंत थोरात 13/07/2022 16:19:08

Right