12/07/2022 20:05:53
1095
अँड. निलेश आंधळे
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाशेरे गावातील कडलगवाडी येथे ओढ्याला पूर आल्यामुळे दोन शाळकरी मुली गौतमी चांगदेव कुडेकर व सुप्रिया बबन कुडेकर ह्या पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेल्या असता पुराच्या पाण्यात गौतमी चांगदेव कुडेकर ही मुलगी वाहत गेली होती परंतु प्रसंगी ओंकार नवनाथ कडलग आणी अनिल गंगाराम कडलग हे दोघेजण जनावरे चारत असताना प्रसंगावधान दाखवून गौतमी चांगदेव कुडेकर हिचे प्रण वाचविले.सदर घटना सोमवार दि. ११/०७/२२ सायंकाळी ५ वाजन्याच्या सुमारास घडली सदर ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पंप असून सदर मुली पिण्याचे पाणी आणण्यास गेल्या होत्या ,सदर पंप पूर्णपणे पुराच्या पाण्यात गेलेला आहे. बंधाऱ्याच्या सांडीचे पाणी पंपाच्या दिशेने गेल्यामुळे ही घटना घडली. कडलगवाडी येथे पिण्याच्या पाण्याचा एकच हातपंप असल्याने आणी तो ही पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे वाडीतील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहे