ब्रेकिंग न्यूज

जवाहर विद्यालय चास येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी शाळेच्या वेळेला अ

18/09/2022 13:01:40  245   पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो

जवाहर विद्यालय चास येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी शाळेच्या वेळेला अनुसरून एसटी बस उपलब्ध व्हावी. !

जवाहर विद्यालय चासकमान ता. खेड जि. पुणे या विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यालयाची नियमित वेळ 10.45 वाजता ते सायंकाळी 4.45 पर्यंत आहे. तसेच सद्यस्थितीत विद्यालयामध्ये रयत गुरुकुल प्रकल्प सुरू असून सदर प्रकल्पासाठी विद्यालयाची वेळ सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.45 वाजेपर्यंत आहे. विद्यालयात पांगरी, कमान, मोहकल, कान्हेवाडी, कडधे, बीबी डॅम, बुरसेवाडी इ. गावांमधून विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यालयात येतात. शाळा सुटल्यावर गाडी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना एक एक तास थांबावे लागत आहे. सदर विद्यार्थी विद्यार्थिनींना शाळेत येण्या जाण्यासाठी वेळेवर घरी जाण्यासाठी शाळेला अनुसरून एसटी बस मिळण्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेड तालुका लिगल सेल यांच्या वतीने राजगुरूनगर एसटी डेपो आगार प्रमुख यांंना देण्यात आले व शाळेला अनुसरून एसटी बस सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी लिगल सेल अध्यक्ष अरुण मुळूक, खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड नवनाथ गावडे, ॲड अतुल गोरडे, ॲड महेश कोहिनकर, ॲड शंकर कोबल, ॲड माणिक वायाळ, ॲड बिभीषण पडवळ इत्यादी उपस्थित होते.