ब्रेकिंग न्यूज

पाईट व्यापारी असोसिएशन वार्षिक स्नेह संमेलना चा कार्यक्रम अतिशय उत्साहात सा

24/11/2022 12:10:26  166   अँड. निलेश आंधळे

पाईट व्यापारी असोसिएशन वार्षिक स्नेह संमेलना चा कार्यक्रम दिनांक 10/11/2022 रोजी अतिशय उत्साहात साजरा झाला....

 

यावेळी पाईट व्यापारी असोसिएशन ची नवीन निवड झालेल्या कार्यकारणी 

 श्री.जितेंद्र सर्यकांत मेहेंदळे (अध्यक्ष )

 श्री.निलेश राजेंद्र गिधे (उपाध्यक्ष)

श्री.समिर मारुती डांगले (खजिनदार )

श्री.बाळासाहेब सहादू रायकर (सचिव )यांचा सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर पाईट व्यापारी असोसिएशन वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमा साठी एक मार्गदर्शक व्याख्याते मा. श्री. सुनील विजय शेटे यांना बोलवण्यात आले होते त्यांनी अतिशय छान प्रकारे सर्वाना व्याख्यान देऊन मार्गदर्शन केले आणि व्यापार कसा करावा,व्यवसाय करताना काय करावे आणि काय करू नये तसेच व्यवसाय कसा वाढवावा आणि त्यासाठी काय केले पाहिजे अशा प्रकारे व्याख्यान झाले सर्वांनी उत्स्फूर्त पणे प्रतिसाद दिला.

 सौ. अस्मिता महेंद्र शेटे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.तसेच माजी अध्यक्ष श्री.विठ्ठलशेठ करंडे यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच  सौ.शिवाकाली रामदास खेंगले यांनी ननिर्वाचित कार्यकारणीचे स्वागत केले.

त्याच प्रमाणे श्री. सागरशेठ पाटोळे हे ही कार्यक्रमा साठी उपस्थित होते त्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले आणि पाईट व्यापारी असोसिएशन साठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेवटी अध्यक्षीय मनोगत मा. श्री जितेंद्र सूर्यकांत मेहेंदळे पाईट व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष यांनी केले

तसेच पाईट व्यापारी असोसिएशन चे उपाध्यक्ष श्री. निलेश राजेंद्र गिधे यांनी सर्वांचे आभार मानले. सुत्रसंचलन ॲड.सागर दत्तात्रय मैड यांनी केले




Raju shinde 24/11/2022 21:56:18

Khup chan


Raju shinde 24/11/2022 21:56:23

Khup chan