सविंदणे गावातील लंघेमळ्यातील मडके वस्ती येथील पुलास निधी अखेर। मंजूर
20 वर्षा पासून माघणी असणारा मडके वस्ती लंघे मळ्यातील पुल अखेर जिल्हा नियोजन समिती बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मंजूर केला आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुरअवस्था व जाण्यायेण्याचा प्रश्न लंघेमळ्यात निर्माण होत होता.
आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी स्वता भेटुन पाठपुरावा करुन पुलास निधी मंजूर करुन घेतला व ग्रामस्थ व त्यांची व्यथा मांडली.
सविंदणे सरपंच सोनालीताई खैरे उपसरपंच भाऊसाहेब लंघे यांच्या व ग्रामस्थांच्या प्रयत्नाना अखेर यश आले आहे. माहीती अधिकार कार्यकर्ते योगेश लंघे यांनी देखील पालकमंत्री यांच्या कडे पुला संदर्भात माघणी केली होती अन्यथा जिल्हा अधिकार कार्यालयांवर चढुन आंदोलन करण्यात येईल असे सांगितले होते. भाजपा चे तालुका अध्यक्ष पांचंगे यांनी देखील पुला बाबतीत माघणी केली होती. अखेर सर्वाच्या प्रयत्ना यश आले असुन 20 वर्षा पासून प्रलंबित व माघणी असलेल्या पुला वर अखेर निधी पडला आहे. मा सरपंच श्री संतोषशेठ मिंडे यांनी सर्वाचे या बाबतीत आभार माणले आहेत...