07/12/2022 03:54:43
268
शुभम दळवी
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील सविंदणे या गावात विविध कार्यकारी सोसायटी मध्ये लाखो रुपये चा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता योगेश लंघे यांनी केली आहे. परंतु तालुका निबंधक मा.न.श्री शंकर कुभांर हे चौकशी करण्यास जाणूनबुजून दिरंगाई करत आहे असे माहीती अधिकार कार्यकर्ता योगेश लंघे यांनी सांगितले. शिरुर तालुक्यातील बेट भागातील 3 सोसायटी मध्ये लाखो रुपये चा भ्रष्टाचार झालेले आहेत. परंतु भ्रष्ट लोक आपल्या स्वार्थी कामा साठी शेतकरी वर्गाची गरीब बॅक म्हणून प्रसिद्ध असलेल्या बॅकेला पण सोडत नाही. सहकारी संस्था ह्या भ्रष्टाचारी अड्डा झाल्या आहेत. या बाबतीत मुंबई हायकोर्टात लवकर याचिका दाखल करणार आहे असे देखील त्यांनी सांगितलं.
सविंदणे येथील सोसायटी लाखो रुपये तोट्यात गेली आहे. लाखो चि औषध व शेत वस्तू विक्री खरेदी करण्यात आल्या .लाखोच्या वस्तू खरेदी करु अनियमितता असने. वस्तू खरेदी मध्ये किंमत वाढून चढून लावणे. वार्षिक आर्थिक अहवाल सभासद असणाऱ्या न देने. पैसे देवान घेवाण मध्ये आर्थिक तडजोड होणे. शेअर्स मध्ये भ्रष्टाचार करणे. कर्ज वाटप व कर्ज माफी सर्व काही संशयाच्या भोवऱ्यात आहे. ह्या व अश्या अनेक मुद्यांवर सोसायटी अडचणी मध्ये आहे. असे असताना निबंधक कुभांर मात्र हाताची घडी व तोंडावर बोट ठेवले आहे असे तक्रारदार यांनी सांगितले. तक्रार करुन 2 महिने होऊन पण अजुन चौकशी करण्यास दिरंगाईमुळे मुळे कुभांर पण अडचणी येण्याची शक्यता आहे.