ब्रेकिंग न्यूज

*मा.दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना (NS

01/01/2023 11:56:03  271   श्री योगेश पडवळ

प्रतिनिधी, योगेश पडवळ. 

_भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष मा.प्रदीप वळसे पाटील यांची प्रमुख उपस्थिती_

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंदार्गत भीमाशंकर शिक्षण संस्था आणि दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय यांचा राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कॅम्प पहाडदरा ता.आंबेगाव येथे संपन्न झाला. दि.२४/१२/२०२२ रोजी सुरू झालेल्या कॅम्पची सांगता आज भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष मा.प्रदीपदादा वळसे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. गेली सात दिवस सुरू असलेल्या या कॅम्प ला अनेक मान्यवरांनी भेट दिली तसेच विद्यार्थ्यांनी देखील गावात साफसफाई ,वृक्ष लागवड, पथ नाट्य ,व्यायाम,कवायती असे विविध उपक्रम घेऊन कॅम्प यशस्वी केला. गावातील ग्रामस्थ ,जिल्हा परिषद शाळा ,सरपंच,उपसरपंच यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले.

   आज या समारोप कार्यक्रमात मा.प्रदीपदादा यांनी सर्वांचे कौतुक करून हा कॅम्प पुढील दोन वर्षे पहाडदरा येथेच होणार असून यावर्षी पेक्षा चांगले आयोजन आणि नियोजन करून महिनाभर अगोदर ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन कार्यक्रम ठरवला जाईल असे सांगितले. यावेळी ख.वि.संघाचे अध्यक्ष भगवान वाघ,मा.सदस्य बाळासाहेब वाघ,शिरदाळे उपसरपंच मयुर सरडे यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

   यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना जेष्ठ संचालक मा.श्री.शांताराम बापू हिंगे, महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.शत्रुघ्न थोरात सर,माजी सभापती मा.आनंदराव शिंदे, धामणी विद्यमान सरपंच सौ.रेश्मा बोऱ्हाडे,पहाडदरा उपसरपंच सौ.सुमन वाघ,मा.सरपंच भीमराव वाघ,संतोष कुरकुटे, शालेय समिती अध्यक्ष महेश वाघ ,सौ.सविता वायकर,उद्योजक गुलाब वाघ,उद्योजक प्रमोद वाघ तसेच बहुसंख्य ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद विद्यार्थी  वसंत जाधव इ.मान्यवर उपस्थित होते.NSS प्रमुख प्रा. शिंदे सर यांनी प्रास्ताविक केले तर प्रा.डोळस सर यांनी आभार मानले.प्रा.वाघ सर,प्रा.भागवत मॅडम,प्रा.टाके मॅडम ,̤ बोंबले मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यालयाचा स्टाप देखील उपस्थित होता.