सविंदणे गावातील अॅड गोरक्ष लंघे शेतकऱ्याचा मुलगा बनला न्यायाधीश.राज्यात 22 वा नंबर
प्रतिनिधी , योगेश पडवळ
हुतात्मा राजगुरुनगर सरसेनापती हंबीरराव मोहिते.विद्यालयाचा विद्यार्थी ,श्री गोरक्ष नानाभाऊ लंघे साहेब . लोकसेवाआयोग कडून घेतण्यात आलेल्या परीक्षेत वर्ग न्याय दंडाधिकारी (न्यायाधीश) पदी निवड झाली.
अॅड गोरक्ष यांनी जे एम एफ सी .परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रात 22 वा क्रमांक मिळवला आहे. तसेच राजगुरुनगर विद्यालयातील हे प्रथम विद्यार्थी जे न्यायाधीश बनले आहेत.
ते मूळचे सविंदने गावचे बारावीपर्यंतचे शिक्षण हे ग्रामीण भागात झाले.
बारावीनंतर त्यांनी खेड या ठिकाणी राजगुरुनगर विद्यालयात एलएलबी साठी पाच वर्ष प्रथम क्रमांकाने 2018 मध्ये उत्तीर्ण झाले .
त्यानंतर त्यांनी राजगुरुनगर सत्र कार्यालयात वकिली सुरू केली.
व त्यांनी अवघ्या अल्प कालावधित.न्यायाधीश बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले.
खडतर प्रवास मोठाभाऊ भगवान लंघे यांनी देखील मोलाची साथ दिली. काही दिवसापुर्वी गोरक्ष लंघे साहेब यांच्या मातोश्री चे निधन झाले. त्या दुखातुन सावरुन मोठं यश संपादन केल्याने . कौतुक होत आहे. आईच्या आठवणी ने डोळे पाणवल्याच गोरक्ष लंघे साहेब यांनी सांगितले. खुप गरीब परीस्थिती वर मात करुन आज जो विजय झाला आहे. तो सर्व दिवंगत आई व भाऊ भगवान लंघे व वडील नानाभाऊ लंघे यांच्या पाठबळा मुळे च आहे असं त्यांनी सांगितलं.
या मध्ये पत्नी अँड तेजश्री लंघे यांची दैखील मोलाची साथ मिळाली असे त्यांनी सांगितलं...