ब्रेकिंग न्यूज

हा गंभीर विषय असून, माझी एमपीएससी आयोगाला..' MPSC डेटा लीक प्रकरणावर नाना भ

25/04/2023 16:24:51  54   उज्वल पाटील

पुणे :: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब आणि गट क साठीची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 30 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे, या परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रवेशपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.

फक्त प्रवेशपत्रिकाच नाही तर विद्यार्थ्यांचे दूरध्वनी क्रमांक, आधार क्रमांक आणि घराचा पत्तादेखील सर्वांसाठी उपलब्ध झाला. यानंतर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी : शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दि 30 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पुर्व परीक्षा गट ब आणि क यांची हॉल तिकीटे सोशल मिडियात लीक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तब्बल 90 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची ही हॉल तिकीटे असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. हा अतिशय गंभीर विषय असून,  शासनाकडे व आयोगा कडे मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भागगिरे यांनी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दि ३० एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पुर्व परीक्षा गट ब आणि क यांची हॉल तिकीटे सोशल मिडियात लीक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तब्बल ९० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची ही हॉल तिकीटे असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. हा अतिशय गंभीर विषय असून 

परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थी नव्या चिंतेत कधी हॉलतिकीट वेळेत मिळत नाही, तर कधी परीक्षाच पुढे ढकलल्या जातात, तर कधी परस्पर गुण कमी केले जातात.

आता लवकरात लवकर हा डेटा लिक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि डेटा सुरक्षित ठेवावा ही मागणी एमपीएससीचे विद्यार्थी करतायत अशी माहिती पुणे शिवसेना शहरप्रमुख यांनी दिली आहे.