खेड कृषी बाजार समिती निवडणुक प्रचाराची रणधुमाळी संपली... मतदार कशावर करणार मतदान ?? कुठला फॅक्टर राहिल प्रभावी ? विधानसभेची हि रंगीत तालीम ठरणार का ?? कुणाचे पारडे असेल भारी? काय आहे ग्राउंड रिपोर्ट ? पैशाचा वापर निकालाची समीकरणे बिघडवणार का ? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे हवीत तर मग वाचाच.....
राजगुुरुनगर : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक जाहीर झाली आणि प्रस्थापित विरुद्ध सर्वपक्षीय अशा दोन गटात तालुक्याची विभागणी झाली. सध्या बाजार समिती आ. दिलिप मोहीते पाटिल यांच्या गटाच्या ताब्यात होती. त्यांच्या विरोधात इतर सर्व पक्षीय मंडळींनी एकत्र येत मोट बांधली आणि तोडीस तोड उमेदार निवडणुक रिंगणात उतरवले. विरोधकांची एकजूट करण्यात महत्वाचा वाटा राहिला शिवसेनेचे नेते संजय घनवट तर भाजपचे नेते अतुल भाउ देशमुख यांचा त्यांच्या बरोबरीनेच मा. जि. प. सदस्य शरद बुट्टे पाटिल, शिवसेनेचे अमोल पवार,अशोक खांडेभराड, भगवान पोखरकर आदी मंडळींनी यात पुढाकार घेतला. तालुक्यातील सर्व पक्षीय नेते एकजुट झाले असल्याने हि विधानसभेची पूर्व तयारी असल्याचे बोलले जात आहे. खेड बाजारसमिती निवणुकीसाठी पॅनल ही संकल्पना काही नवीन नाही. यापूर्वी देखील अगदी ३ पॅनल होऊन निवडणुका पार पडलेल्या आहेत. यावेळी आ. दिलिप मोहिते पाटील विरुद्ध इतर सर्व अशी सरळ लढत पहायला मिळणार आहे. आ.दिलीप मोहिते पाटील यांनी स्वत: फॉर्म भरुन निवडणुक प्रतिष्ठेची केली. तर विरोधी पॅनलने विजयसिंह शिंदे, भगवान पोखरकर, सागर मुऱ्हे, विश्वास बुट्टे पाटिल, सोमनाथ मुंगसे अशा दिग्गज उमेदार मैदानात उतरवून या निवडणुकीत रंगत आणली. सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध आणि आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे नेतृत्व असलेला श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी पॅनल हा नियोजनात, मतदारांपर्यंत पोहोचण्यात तसेच प्रसिद्धीमध्ये उजवा राहिला. तर विरोधी पॅनलने देखिल प्रचार सभामध्ये गर्दी जमवून यावेळी परिवर्तनाचा नारा दिला. आ. दिलिप मोहिते पाटील दर दिवशी वेगवेगळ्या भागात २ सभा घेउन कार्यकर्त्यांत उत्साह भरुन देत होते त्याचवेळी विरोधी पॅनलच्या होणाऱ्या सभांमध्ये मोहिते यांच्यावर सर्व पक्षीय नेते टीकास्त्र सोडत होते. या रणधुमाळीत ही निवडणुक जणू काही दिलीप मोहिते यांच्याच विरोधात असल्याचे जाणवत होते. यापुढे कोणतीही निवडणुक लढवणार नाही असे म्हणणाऱ्या आ. दिलिप मोहिते पाटील यांनी बाजार समिती ला फॉर्म भरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि जर स्व. आ. नारायणराव पवार जर आमदार असताना सभापती होऊ शकतात आ. दिलिप मोहिते पाटील का होऊ शकत नाहीत असा राग आळवताना कार्यकर्ते दिसले. या निवडणुकित सर्व सामान्य मतदारांशी चर्चा केली असता मतदारांचा वेगवेगळा कौल आणि वेगवेगळा फॅक्टर जाणवला त्यात १) उमेदवार कोणत्या पॅनल चा आहे त्यावर (कारण स्थानिक राजकारणात मतदाराला त्याच्या पक्षासोबत काम करावे लागते अजूनही पक्षाच्या विजयात तो अजूनही स्वतः चा विजय मानतो)
२) उमेदवार हा माझ्या भागातील आहे. (भागाचा अभिमान म्हणून)
३) उमेदवार हा माझा जवळचा, लांबून जवळचा नातेवाईक आहे. ( मग तो कोणत्याही पॅनल मधून का असेना)
४) कोणत्या उमेदाराचे पाकीट वजनदार आहे. (सध्या ३ ते ५ ते १० ते २५ पर्यंत)
५) कोणता उमेदवार हा सुख दुःखात अडी अडचणीच्या कामात उपलब्ध असतो.
६) प्रचारात सर्वाधिक पोहचला तसेच जवळच्या व्यक्ती त्याच्याबाबत सांगितले आहे.
या आणि अशा फॅक्टर वर मतदार त्यांचा कौल देतील असे एकंदरीतच अंदाज आहे. यातील मतदारांचा कौल देण्याचा अनुक्रम वेगवेगळा असू शकतो. परंतु सध्या तरी याच धर्तीवर निवडणुकीचा कौल ठरेल अशी चर्चा आहे. या निवडणूकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असतांनाच कोणत्या पॅनलचे पारडे जड ठरणार ?? असा प्रश्न मतदारांत चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी मतदार खाजगीत बोलताना ६०/४० होईल असे सांगत आहेत तर काहींचा ७०/३० चा देखील अंदाज आहे. एकूणच १०/६ होईल असे दिसत आहे.दोन्हीही पॅनलने विजयाचा विश्वास वर्तविला असला तरी ही निवडणुक एकतर्फी होईल अशी स्थिती आता राहिली नाही. सर्व पक्षीय पॅनल कडून ९ जागांचा विश्र्वास व्यक्त होत आहे. तर सत्ताधारी पॅनल ला १४ पेक्षा अधिक जागा घेउन बहुमत मिळेल असा विश्र्वास वाटत आहे. एकंदरीतच चुरशीच्या होणाऱ्या निवडणूकीत सत्ताधारी पॅनल चे पारडे जड दिसत आहे. यात मागील निवडणुकीत दिलीप मोहिते यांचा उमेदारी अर्ज बाद करण्यात विरोधकांना यश येवून देखिल बाजार समितीत दिलीप मोहिते यांची सत्ता आली आता तर आमदार दिलीप मोहिते स्वतः रींगनात आहेत त्यामुळे पॅनल साठी परिपक्व प्रयत्न ते करतील असा विश्र्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. मात्र सर्व पक्षीय पॅनलने राबविलेल्या यंत्रणेतून या निवडणुकीचे निकाल काय असणार हे अंदाज वर्तविने घाईचे होणार आहे. उदया होणाऱ्या निवडणूकीत मतदार त्यांचा कौल मतपेटीत बंद करणार आहेत. उद्याच होणाऱ्या मतमोजणीत ताणली गेलेली उत्कंठा संपेल आणि रात्रि उशिरा पर्यंत निकाल हाती येतील. या निकालाची उत्सुकता इतरही तमाम जनतेला आहे कारण या निवडणूकीत पैशाचा झालेला अतिवापर पैसा या निडणुकीची दिशा ठरवणार का ?? या प्रश्नाचे अचूक उत्तर देखील हा निकाल देऊन जाईल.