ब्रेकिंग न्यूज

श्रीनाथ मेटल्स, खेडसिटी (कनेरसर) यांच्या वतीने मुक्या जनावरांना चारा वाटप..

09/06/2023 20:12:15  81   पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो

श्रीनाथ मेटल्स, खेडसिटी (कनेरसर) यांच्या वतीने मुक्या जनावरांना चारा वाटप...

भिमाशंकर:

कडाक्याच्या उन्हाळ्यात गोशाळेतील मुक्या जनावरांना चाऱ्याची गरज असल्याने श्री क्षेत्र भीमाशंकर येथील "श्री समर्थ गोशाळा" येथे श्रीनाथ मेटल्स चे एम.डी. श्री बाळासाहेब पाचारणे यांसकडून एक पीक -अप भरून चारा पोहोच करण्यात आला.

गोशाळेचे प्रमूख बाळासाहेब कौदरे यांनी या वर्षी पाऊस लांबणीवर गेल्याने चाऱ्याची कमतरता भासत असल्याचे सांगितले. दानशूर मंडळींनी पुढे येऊन गोशाळेत चारा पाठवावा अशी विनंती केली. सध्या गो शाळेत १३५ लहान मोठ्या गाई आहेत.