ब्रेकिंग न्यूज

आळेफाटा पोलिसांतर्फे जनजागृती अभियान.....

16/07/2023 12:56:43  60   शुभम दळवी आळेफाटा

आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील महिला संदर्भात काम करणाऱ्या महिला संघटना महिला बचत गट यांची भेट घेऊन त्यांना महिलांच्या सुरक्षिततेबाबत तसेच महिलांचे दागिने मौल्यांन वस्तू घरातील सोने दागिने रोख रक्कम यांची कशाप्रकारे सुरक्षा करावी व कशी काळजी घ्यावी याबाबत त्यांचे भेट घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत .

➡️महिलांनी रस्त्याने जाताना किंवा प्रवासादरम्यान आपले दागिने सुरक्षित कपड्याने झाकून घ्यावेत .

➡️आपल्या घरातील मौल्यवान दागिने पैसे सुरक्षित ठिकाणी तसेच बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावे .

➡️महिलांच्या सुरक्षित संदर्भात कुठेही काही प्रकार निदर्शनास आले असतात आम्हाला किंवा पोलीस स्टेशनची संपर्क साधने बाबत आव्हान करण्यात आलेले आहेत .

➡️सदर ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महिला यांनी आम्ही पोलीस सुरक्षा दूत म्हणून काम करणार असून आम्ही स्वतःच्या दागिन्यांची मौल्यवान वस्तूंचे काळजी घेऊ तसेच इतरांनाही काळजी घेणे बाबतचे आव्हान करणार असल्याबाबत सांगितले आहे .

 

माननीय सविनय सादर 

 

यशवंत नलावडे

 पोलीस निरीक्षक 

आळेफाटा पोलीस स्टेशन