सरपंच काँन्टरॅक्टर झाले कशी कामे दर्जेदार होणार ?? आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या आमदार निधीतून संगम गार्डन वासियांना पेव्हींग ब्लॉक बसविणे कामी १० लक्ष रुपयेचा निधीचे कामाचे उदघाटनप्रसंगी आ.दिलिप मोहिते यांचे प्रतिपादन...
सातकरस्थळ : वाडारोड सातकरस्थळ येथील संगम गार्डन सोसायटी मध्ये आमदार निधीमधून १० लक्ष रुपये चे पेव्हींग ब्लॉक बसविणेंचे कामाचा उदघाटन समारंभ पार पडला. संगम गार्डन अंतर्गत रस्त्याला दोन्ही बाजूने पेव्हिंग ब्लॉक बसविणे असे कामाचे स्वरूप असणार आहे. यावेळी बोलताना आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी बोलताना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले कंत्राटदार लांबचा असू नाहीतर जवळचा असू काम दर्जेदार करून घ्या आवश्यक वाटल्यास अजून पैसे देता येईल असे मोहिते पाटील म्हणाले. यावेळी अरुण भाऊ चांभारे, शहराध्यक्ष दिलीप होले, वैभव नाईकरे पाटील, सरपंच संजीवनी ताई थिगळे, राजगुरुनगर सह. बँकेचे संचालक विनायक घुमटकर, वैभव घुमटकर, अमित घुमटकर, संतोष भांगे, चेतन पिंगळे, पप्पू बनसोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी सार्व. बांधकाम विभागाचे एस. डी. मुरकुटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एस.मोटे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्षम ग्रा. प. सदस्य अजय चव्हाण, नागेश बिरादार, रोहित बोरकर, सन्मान तांबे, संदीप डामसे, किरण मधे, अनिष कोठवडे, अभी चव्हाण, ओंकार सणस, प्रल्हाद बेल्हेकर, प्रमोद सुपे, अमीर शेख, निमेश जांभळे आदी कार्यकर्त्यांनी केले. कंत्राटदार रवी पाचारणे यांची नियोजन केले. सूत्रसंचालन कैलासराव दुधाळे यांनी केले. तर आभार खंडेराव थिगळे यांनी मानले.