ब्रेकिंग न्यूज

राजगुरूनगर येथील श्रीवैभवलक्ष्मी नवरात्र महिला मंडळाकडून विश्व हिंदू परिषद

14/09/2023 18:50:24  37   अँड. निलेश आंधळे

राजगुरूनगर येथील श्रीवैभवलक्ष्मी नवरात्र महिला मंडळाकडून विश्व हिंदू परिषद संचलित वनवासी विद्यार्थी वसतिगृहास रुपये 21000 चा धनादेश प्रदान......

पाईट, ता. 13-01- राजगुरूनगर येथील श्रीवैभवलक्ष्मी नवरात्र महिला मंडळा(बोल्हाई मंदिराजवळ)कडून विश्व हिंदू परिषद संचलित वनवासी विद्यार्थी वसतिगृहास रुपये 21000 चा धनादेश प्रदान करण्यात आला.

     त्यावेळी वनवासी विद्यार्थी वसतिगृहाचे पालक दिलीप देशपांडे व अधीक्षक अमोल डमरे,श्रीवैभवलक्ष्मी नवरात्र महिला मंडळाच्या  संस्थापक अध्यक्षा वनिता कोरे,मंडळाच्या सदस्या गीता कांबळे,संगीता घुमटकर,रेखा कासवा,शोभा पोखरणा,हेमांगी कोरे,नीता घुमटकर,हेमलता पंडित  व इतर अनेक महिला उपस्थित होत्या.

       याबाबत सविस्तर माहिती अशी की,श्रीवैभवलक्ष्मी नवरात्र मंडळ सदस्य महिलांच्या दैनंदिन एक रुपया वर्गणीवर सुमारे 12 वर्षे यशस्वीपणे चालवले गेले.मात्र सन 2015 साली काही कारणास्तव सदर मंडळ बंद करण्यात आले.मात्र मंडळाच्या बँक खात्यावर असलेली शिल्लक रक्कम तशीच पडून होती. सदर शिल्लक रकमेचा विनियोग सर्व सदस्य महिलांच्या विचार विनिमयाने राजगुरूनगर मधील विश्व हिंदू परिषद संचलित वनवासी विद्यार्थी वसतिगृहास देण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.

   त्यानुसार मंडळाच्या बँक खात्यावर असलेले रुपये 21000 चा धनादेश वसतिगृहाचे अधीक्षक डमरे यांचेकडे सर्व विद्यार्थ्यांच्या व वैभवलक्ष्मी मंडळाच्या महिलांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.